शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

युरोपमध्ये आतापर्यंत झालेले दहशतवादी हल्ले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 9:07 AM

गजबजलेल्या, गर्दी असलेल्या भागात गाडी घुसवून दहशतवादी हल्ला करण्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत.

ठळक मुद्दे017 साल सुरु झाल्यापासून युरोपमध्ये आतापर्यंत अशा प्रकारचे आठ हल्ले झाले आहेत.

लंडन, दि. 18 - गजबजलेल्या, गर्दी असलेल्या भागात गाडी घुसवून दहशतवादी हल्ला करण्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. 2017 साल सुरु झाल्यापासून युरोपमध्ये आतापर्यंत अशा प्रकारचे आठ हल्ले झाले आहेत. गुरुवारी स्पेनच्या रॅमब्लास आणि कॅम्ब्रिल्समध्येही अशाच प्रकारचा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात आतापर्यंत शेकडो निरपराध नागरीकांचा बळी गेला असून अनेक जण जखमी झाले आहेत. 

आणखी वाचा स्पेनच्या कॅम्ब्रिल्समध्येही हल्ल्याचा प्रयत्न, पाच दहशतवादी ठारस्पेनमध्ये दहशतवादी हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू, इसिसनं स्वीकारली जबाबदारीफ्रान्समध्ये दहशतवादी हल्ल्यात ८४ नागरिक ठार

लास रॅमब्लासदहशतवाद्यांनी स्पेनच्या बार्सिलोना शहरातील लास रॅमब्लास या गर्दी असलेल्या भागात व्हॅन घुसवून अनेकांना चिरडलं. या हल्ल्यात 13 जण ठार झाले असून, 100 हून अधिक जखमी झाले.

कॅम्ब्रिल्सस्पेनच्या कॅम्ब्रिल्समध्येही अशाच प्रकारचा हल्ल्याचा प्रयत्न झाला. यात सहा नागरीक आणि एक पोलिस अधिकारी जखमी झाला. यावेळी सर्तक असलेल्या पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच दहशतवादी ठार झाले. 

लेव्हलॉइस-पेरेट  पॅरिसच्या उपनगरात लेव्हलॉइस-पेरेट येथे बीएमडब्ल्यू 2- सीरीजची गाडी चालवणा-या चालकाने लष्करी जवानांना आपल्या गाडीखाली चिरडले होते. या घटनेत सहाजण जखमी झाले होते. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर होती. यावर्षी 9 ऑगस्टला ही घटना घडली होती. 

फिन्सब्युरी पार्क, लंडन लंडनच्या फिन्सब्युरी पार्क येथे मशिदीबाहेर थांबलेल्या लोकांना गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न झाला होता. लंडन ब्रिजवर झालेल्या हल्ल्याचा हा बदला घेण्यासाठी आपण हे कृत्य केले असे वाहनचालकाचे म्हणणे होते. यावर्षी 19 जूनला ही घटना घडली. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.  

लंडन ब्रिज यावर्षी 3 जूनला लंडन ब्रिजवर दहशतवादी हल्ला झाला होता. भरधाव वेगात आलेल्या कारने आधी पादचा-यांना चिरडले. त्यानंतर तीन हल्लेखोर गाडीतून उतरले व त्यांनी लोकांना भोसकण्यास सुरुवात केली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांनी तिन्ही कंठस्नान घातले. या हल्ल्यात आठ जण ठार झाले तर, 48 जण जखमी झाले होते. 

स्टॉकहोल्म स्वीडनच्या स्टॉकहोल्म शहरात यावर्षी 7 एप्रिलला गर्दीत लॉरी घुसवून दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोराने लॉरीचे अपहरण केले व येथील गजबजलेल्या रस्त्यावर भरधाव वेगात लॉरी चालवून अनेकांना चिरडले. यात पाचजण ठार तर, 14 जण जखमी झाले होते. या लॉरीमध्ये स्फोटके सापडली होती. 

वेस्टमिनस्टर, लंडन यावर्षी 22 मार्चला लंडनच्या वेस्टमिनस्टर ब्रिजवर पादचा-यांना गाडीखाली चिरडण्यात आले होते.  हल्लेखोराने यावेळी गाडीतून उतरुन एका पोलिसाची भोसकून हत्या केली होती. या कार हल्ल्यात पाच नागरीकांचा मृत्यू झाला तर, 49 जण जखमी झाले. 

बर्लिन जर्मनीच्या बर्लिन शहरातील नाताळ बाजारपेठेत मागच्यावर्षी लॉरी गर्दीत घुसवून हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोराने ड्रायव्हरची हत्या करुन लॉरी चोरली. त्यानंतर नाताळ बाजारपेठेत बेदरकारपणे लॉरी चालवून अनेकांना चिरडले. या घटनेच 11 पादचा-यांचा मृत्यू झाला तर, 56 जखमी झाले होते. मागच्यावर्षी 19 डिसेंबर 2016 रोजी ही घटना घडली होती. 

नीसमध्ये दहशतवादी हल्ला फ्रान्समधील नीस शहरात मागच्यावर्षी राष्ट्रीय दिन साजरा करण्यासाठी जमलेल्या नागरिकांना एका इसमाने ट्रकने चिरडल्याने ८४ जण ठार तर १०० पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले होते. 

टॅग्स :Terrorismदहशतवाद