शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
4
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
5
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
6
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
7
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
8
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
9
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
10
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
11
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
12
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
13
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
14
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
15
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
16
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
17
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
18
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
19
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
20
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!

पाकिस्तानात पुन्हा दहशतवादी हल्ला; चार पोलिसांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 14:05 IST

स्फोटकांनी भरलेलं वाहन पोलीस स्टेशनमध्ये घुसवून घडवला स्फोट

Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा मोठा हल्ला केला आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य केले. पोलीस ठाण्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चार पोलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. या दहशतवादी हल्ल्यात एकूण १६ जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण वझिरीस्तान आदिवासी जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या डेरा इस्माईल खान जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या दरबान पोलिस स्टेशनवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी प्रथम स्फोटकांनी भरलेले वाहन पोलीस स्टेशनच्या इमारतीत घुसवले, त्यानंतर मोर्टार हल्ला करत ब्लास्ट घडवून आणला.

१६ जण जखमी

या संपूर्ण प्रकरणात स्थानिक पोलिसांनी सांगितले की, या हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि हल्लेखोरांमध्ये झालेल्या गोळीबारात किमान चार सुरक्षा कर्मचारी मृत्यूमुखे पडले तर १६ जण जखमी झाले. या चकमकीत पोलिसांनी दोन दहशतवाद्यांनाही ठार केल्याची माहिती खैबर पख्तूनख्वा पोलिसांनी दिली आहे. उर्वरित दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. हल्ला करण्यासाठी आलेल्या दहशतवाद्यांची संख्या किती होती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांना सतर्क करण्यात आले. परिसरातील नागरिकांना सतर्क करून तातडीने कारवाई सुरू करण्यात आली, ज्यामध्ये दोन दहशतवादी तिथे ठार झाले.

शाळा, महाविद्यालये बंद

दहशतवादी हल्ल्यानंतर नवीन पोलीस तुकडी तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आली. दहशतवादी हल्ल्यामुळे जिल्हा रुग्णालयात आणीबाणी जाहीर करण्यात आली असून सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानterroristदहशतवादीPoliceपोलिसDeathमृत्यूBlastस्फोट