इस्रारायलमध्ये दहशतवादी हल्ला? कारने पादचाऱ्यांना चिरडले, पोलिसांवरही चाकूहल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 22:08 IST2025-02-27T22:07:24+5:302025-02-27T22:08:26+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित हल्लेखोराने गर्दीत गाडी घुसवली आणि घटनास्थळावरून पसार झाला. मात्र त्याला गान शमूएलजवळ अटक करण्यात आली.

इस्रारायलमध्ये दहशतवादी हल्ला? कारने पादचाऱ्यांना चिरडले, पोलिसांवरही चाकूहल्ला
उत्तर इस्रायलमध्ये गुरुवारी एका धक्कादायक घटना घडली. येथे एका वाहनाने पादच्याऱ्यांना चिरडले. या घटनेत साज जण जखमी झाले आहेत. ही घटना परदेस हन्ना-कारकुर जंक्शनजवळ हायवे ६५ वर घडली. यानंतर इस्रायल पोलीस दहशतवादी हल्ल्याच्या अँगलने घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित हल्लेखोराने गर्दीत गाडी घुसवली आणि घटनास्थळावरून पसार झाला. मात्र त्याला गान शमूएलजवळ अटक करण्यात आली.
इस्राइलची आपातकालीन सेवा मॅगन डेव्हिड एडोमने (एमडीए) दिलेल्या माहितीनुसार, घटना स्थळीच सात जखमींवर उपचार सुरू आहे. यांपैकी एकाची प्रकृती गंभी आहे. जखमींमध्ये 20 ते 70 वर्षांच्या पाच पुरुषांचा आणि तीन महिलाचा समावेस आहे. गंभीर जखमी असलेल्या दोघांसह सहा जणांना हेदेरा येथील हिलेल याफे मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. याशिवाय, याशिवाय, घटनास्थळी दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर चाकू हल्लाही करण्यात आला आहे. यामुळे येथील परिस्थिती आणखी तणावपूर्ण झाली आहे.
एका पोलीस प्रवक्याने दिलेल्या माहितीनुसार, "प्राथमिक माहितीच्या आधारे, अटक करण्यात आलेल्या संशयितानेच हा हल्ला केला." हल्लेखोराने बस स्थानकात अनेक लोकांना चिरडले, चाकूने हल्ला केला आणि नंतर पोलिसांच्या वाहनालाही धडक दिली. याशिवाय, हा नियोजित दहशतवादी हल्ला होता का? याचा तपास पोलीस करत आहेत, असेही संबंधित अधिकाऱ्याने म्हटले आहे.
या घटनेनंतर, अस्रायली पोलिसांनी संबंधित भाग सील केला आहे. आणि प्रकरचा कसून तपास सुरू आहे. जखमींच्या कुटुंबीयांनाही घटनेची माहिती देण्यात आली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, अशा घटना रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी परिसरात गस्त वाढवली आहे.