इस्राइलमधील तेल अवीव येथे दहशतवादी हल्ला झाला आहे. एका दहशतवाद्याने केलेल्या चाकूहल्ल्यामध्ये ४ जण जखमी झाले आहेत. इस्राइली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ला करणारा दहशतवादी अब्देल अजीज कद्दी हा मोरक्को येथील रहिवासी आहे. दरम्यान, पोलिसांनी या दहशतवाद्याला गोळ्या झाडून ठार केले आहे. हल्लेखोराकडून एक आयडी जप्त करण्यात आला आहे.
एका वृत्तानुसार सुरक्षा यंत्रणा शिन बेटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अब्देल अजीज याला इस्राइलमध्ये प्रवेश करताना सुरक्षा रक्षकांनी अडवले होते. आता संशय आला असतानाही त्याला प्रवेश का देण्यात आला, याचा प्रश्न विचारला जात आहे. हा दहशतवादी १८ जानेवारी रोजी टुरिस्ट व्हिजावरून इस्राइलमध्ये दाखलल झाला होता. तीन दिवसांच्या आत इस्राइलमध्ये झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे.
इस्राइलची अॅम्ब्युलन्स सेवा मॅगन डेव्हिड एडोमने सांगितले की, ह हल्ला तेल अवीव येथील नाहलात बिन्यामिन येथे झाला. या चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या ४ जणांमध्ये दोन तरुणांचं वय हे २४ ते २८ वर्षांच्या दरम्यान, आहे. तर दोन इतर जणांचं वय २४ आणि ५९ वर्षे एवढं आहे.
इस्राइलचे गृहमंत्री मोशे अर्बेल यांनी सांगितले की, अब्लेल अजीज हा जेव्हा बेन गुरियन विमानतळावर उतरला, तेव्हा इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला धोकादायक मानून अडवले होते. त्याला सुरक्षा अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले होते. मात्र सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याला इस्राइलमध्ये प्रवेश करण्याची परवानी दिली होती.