शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
4
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
5
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
6
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
7
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
8
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
9
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
10
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
11
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
12
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
13
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
14
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
15
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
17
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
18
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
19
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे

तणाव वाढला, चीन नरमला! म्हणाला, अमेरिकेवर पहिली गोळी झाडणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 08:30 IST

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या एका वृत्तानुसार दक्षिण समुद्रातील वादग्रस्त भागात सध्या चीन आणि अमेरिका दोन्ही देश सैन्याची ताकद वाढवू लागले आहेत. या साऊथ चायना सीवर चीनची कम्युनिस्ट पार्टी दावा सांगत आली आहे. 

दक्षिण चीन समुद्रात सुरु असलेल्या युद्धाभ्यासावेळी अमेरिका आणि चीनमध्ये तणाव वाढू लागला आहे. यावर चीनने आपल्या सैनिकांना नरमाईचे आदेश दिले असून अमेरिकी सैन्य़ावर कोणत्याही परिस्थितीत पहिली गोळी चालवू नका, असे निर्देश दिले आहेत. अमेरिकेचे आरोग्य मंत्री चार दशकांनंतर तैवानच्या दौऱ्यावर असताना चीनचे हे आदेश आले आहेत. 

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या एका वृत्तानुसार दक्षिण समुद्रातील वादग्रस्त भागात सध्या चीन आणि अमेरिका दोन्ही देश सैन्याची ताकद वाढवू लागले आहेत. या साऊथ चायना सीवर चीनची कम्युनिस्ट पार्टी दावा सांगत आली आहे. या वादग्रस्त क्षेत्रात आता अमेरिका सारखा दबाव वाढवत असून अशात दोन्ही अण्वस्त्र संपन्न देशांमध्ये युद्ध होण्याचे संकेत आहेत. यामुळे चीन वाढता तणाव कमी करू इच्छित आहे. कारण सध्या अमेरिकेत निवडणुकीचे वारे असून कट्टरवादी गट या तणावाचा फायदा घेण्याची भीती चीनला वाटू लागली आहे. असे झाल्यास दोन्ही देशांमधील संबंध भविष्यात बिघडण्याची शक्यता आहे. यामुळे चीनने त्यांच्या लढाऊ विमानांच्या पाय़लटांना आणि नौसेनेला अमेरिकेच्या युद्धनौका आणि लढाऊ विमानांच्या दळणवळणाला प्रतिकार न करण्यासाठी संयम बाळगण्याचे आदेश दिले आहेत. 

चीनची सरकारी वृत्तसंस्था ग्लोबल टाईम्सने अमरिकेच्या युद्धनौकांना भलेही कागदी वाघ म्हटले असेल तरीही सुत्रांनुसार अमेरिका सैन्यासोबत होत असलेल्या संघर्षावरून चीनचे सैन्यही तणावात आहे. चीनने अनेक प्रकारे अमेरिकेला परिस्थिती निय़ंत्रणात ठेवण्यासाठी आमच्याकडून पहिली गोळी झाडली जाणार नाही, असे संदेश पोहोचविण्याचे प्रयत्न केले आहेत.

गेल्या महिन्यात चीनच्या हवाईदलाने अमेरिकेसोबतचा तणाव पाहता हवाई युद्धाच्या तयारीसाठी अभ्यास केला. तर अमेरिकेच्या विमानांनीही या भागात युद्धसराव सुरु केला आहे. चीनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, आम्ही रात्रीच्यावेळी समुद्रात लांब पल्ल्याचे बॉम्ब टाकण्याचा अभ्यास केला. यावेळी अनेक डमी लक्ष्य बॉम्बने उडवून देण्यात आले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

पुन्हा बिहार! नितीश कुमार आज उद्घाटन करणार होते; मेगा ब्रिजचा रस्ताच कोसळला

Gold Rate : सोन्या, चांदीचे दर गडगडले; कोरोना व्हॅक्सिनचा प्रभाव

OMG! न्युझीलंडवर कोरोनाचा छुपा वार; 102 दिवसांनंतर 4 नवे रुग्ण, ऑकलंड लॉकडाऊन

CoronaVaccine: कोरोना लसीवर रशियाचा शॉर्टकट धोक्याचा; जागतिक तज्ज्ञांचा गंभीर इशारा

पंतप्रधान मोदी लवकरच मोठ्या घोषणा करण्याची शक्यता; हे आहेत अंदाज

खतरनाक Video! WWE मध्ये नव्या सुपरस्टार्सची एन्ट्री; रिंगच तोडल्याने भरली धडकी

चिनी कंपन्यांवर आयकर विभागाचे छापे; 1000 कोटींचे हवाला 'घबाड' हाती लागले

टॅग्स :chinaचीनAmericaअमेरिका