पंतप्रधान मोदी लवकरच मोठ्या घोषणा करण्याची शक्यता; हे आहेत अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 09:05 AM2020-08-12T09:05:17+5:302020-08-12T10:23:47+5:30

इंडस्ट्रीला अधिकाधिक स्पर्धात्मक बनविण्याचा हा प्रयत्न आत्मनिर्भर भारताच्या अभियानाचा हिस्सा आहे. हे पॅकेज पीएम गरीब कल्याण योजना आणि आत्मनिर्भर भारत योजनेनंतरची मोठी घोषणा ठरणार आहे.

Prime Minister Modi likely to make big announcements soon; These are the guesses | पंतप्रधान मोदी लवकरच मोठ्या घोषणा करण्याची शक्यता; हे आहेत अंदाज

पंतप्रधान मोदी लवकरच मोठ्या घोषणा करण्याची शक्यता; हे आहेत अंदाज

Next

नवी दिल्ली : मोदी सरकार लवकरच काही नवीन योजना, निर्णयांच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. यामध्ये पॉलिसीमध्ये बदल ते काही नवीन इन्फ्रास्ट्रक्टर प्रोजेक्ट आहेत. याच्याशी संबंधित एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्थेमध्ये पुन्हा प्राण आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मोदी सरकारच्या सुत्रांनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदीच काही महत्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. यामध्ये काही घोषणा कर संकलनाबाबतही नवीन दिशा देणाऱ्या आहेत. या घोषणा 13 ऑगस्टपर्यंत केल्या जातील. 


इंडस्ट्रीला अधिकाधिक स्पर्धात्मक बनविण्याचा हा प्रयत्न आत्मनिर्भर भारताच्या अभियानाचा हिस्सा आहे. हे पॅकेज पीएम गरीब कल्याण योजना आणि आत्मनिर्भर भारत योजनेनंतरची मोठी घोषणा ठरणार आहे. याआधी आणल्या गेलेल्या योजना कोरोनाच्या झटक्यापासून इंडस्ट्रीला वाचविण्यासाठी होत्या. आता अर्थव्यवस्थेमध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 


जे प्रस्ताव बनविण्यात आले आहेत, त्यामध्ये टॅक्स अॅडमिनिस्ट्रेशनला डिजिटल तंत्रज्ञानावर अधिक केंद्रीत करण्यात येणार आहे. यामध्ये करदात्यांच्या अधिकाराची घोषणा असू शकते. तसेच संरक्षण दलाच्या खरेदीची घोषणा असू शकते. याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्टरवर होणाऱ्या खर्चाचीही घोषणा असू शकते. हे प्रकल्प एका ठराविक मुदतीत पूर्ण करणे कठीण जाणार आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

Gold Rate Today : सोन्या, चांदीचे दर गडगडले; कोरोना व्हॅक्सिनचा प्रभाव

CoronaVaccine: कोरोना लसीवर रशियाचा शॉर्टकट धोक्याचा; जागतिक तज्ज्ञांचा गंभीर इशारा

खतरनाक Video! WWE मध्ये नव्या सुपरस्टार्सची एन्ट्री; रिंगच तोडल्याने भरली धडकी

चिनी कंपन्यांवर आयकर विभागाचे छापे; 1000 कोटींचे हवाला 'घबाड' हाती लागले

मध्यरात्री पानिपतच्या हायवेवर 'पती, पत्नी और वो'मध्ये धुमशान; दीराच्या मदतीने पकडले

Gold Rate: सोन्याची झळाळी! दिवाळीपर्यंत 70000 वर जाण्याची शक्यता; गुंतवणूक करायची का?

राम मंदिरासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले 50 कोटी; जाणून घ्या व्हायरल सत्य

Web Title: Prime Minister Modi likely to make big announcements soon; These are the guesses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.