युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 12:45 IST2026-04-10T12:43:42+5:302026-04-10T12:45:04+5:30

दोन आठवड्यांच्या युद्धविरामाच्या घोषणेसह ट्रम्प यांनी शांततेचे संकेतही दिले आहेत. इराण आता संघर्षाला कंटाळला असून पुनर्बांधणीच्या मार्गावर आहे. आम्ही टॅरिफ आणि निर्बंधांमध्ये सवलत देण्याबाबत इराणशी चर्चा करत आहोत आणि १५ पैकी अनेक मुद्द्यांवर आधीच सहमती झाली असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

Tensions remain even after ceasefire With or without Iran Trump's direct warning before Islamabad meeting | युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा

युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा


अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांत शांतता चर्चा होणार आहे. मात्र यापूर्वीच, जगभरातील कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि होर्मुजच्या समुद्रधुनीवरील वाढता तणाव, या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी (९ एप्रिल) इराणला अगदी कडक शब्दात पुन्हा एकदा थेट इशारा दिला आहे. इराणची मदत असो अथवा नसो, होर्मुझमधून तेल पुरवठा लवकरच सुरळीत होईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच, युद्धविरामाच्या काळात इराणने होर्मुजच्या समुद्रधुनीतून ये-जा करणाऱ्या जहाजांकडून कुठल्याही प्रकारची टोल वसुली करू नये, असा इशाराही त्यांनी इराणला दिली आहे.

महत्वाचे म्हणजे, नुकताच अमेरिका आणि इराण यांच्यात होर्मुजची समुद्रधुनी पुन्हा खुली करण्यावर नुकतीच सहमती झाली आहे. यानंतर, इराणने या मार्गावरून दिवसाला १५ जहाजांना जाण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर पोस्ट करत, "इराण टँकर्सकडून फी वसूल करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशे होत असेल तर त्यांनी हे त्वरित थांबवायला हवे. इराण या बाबतीत अत्यंत चुकीचे काम करत असून आमचा करार असा नव्हता, असे म्हटले आहे.

याशिवाय, दुसऱ्या एका पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले, "लवकरच तुम्हाला इराणच्या मदतीने अथवा मदतीशिवाय तेलाचा पुरवठा पुन्हा सुरू झालेला दिसेल आणि मला त्याची पर्वा नाही." दरम्यान, फायनान्शिअल टाइम्स'ने इराणच्या तेल, वायू आणि पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या निर्यातदार संघटनेचे प्रवक्ते हमीद होसेनी यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, इराण जहाजांना क्रिप्टोकरन्सीमध्ये वाहतूक शुल्क भरण्याची अट ठेवेल, असे म्हटले आहे. 

दोन आठवड्यांच्या युद्धविरामाच्या घोषणेसह ट्रम्प यांनी शांततेचे संकेतही दिले आहेत. इराण आता संघर्षाला कंटाळला असून पुनर्बांधणीच्या मार्गावर आहे. आम्ही टॅरिफ आणि निर्बंधांमध्ये सवलत देण्याबाबत इराणशी चर्चा करत आहोत आणि १५ पैकी अनेक मुद्द्यांवर आधीच सहमती झाली असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

 

Web Title : युद्धविराम के बाद भी तनाव: ट्रम्प ने होर्मुज जलडमरूमध्य पर ईरान को चेतावनी दी

Web Summary : इस्लामाबाद वार्ता से पहले, ट्रम्प ने ईरान को युद्धविराम के दौरान होर्मुज जलडमरूमध्य में शुल्क लगाने के खिलाफ चेतावनी दी। उन्होंने कहा कि हालिया समझौते के बावजूद, ईरानी सहायता के साथ या उसके बिना तेल का प्रवाह फिर से शुरू होगा। ट्रम्प ने ईरान के साथ प्रतिबंधों में ढील देने पर चर्चा का भी उल्लेख किया, जिससे संभावित शांति का संकेत मिलता है।

Web Title : Tensions Remain After Ceasefire: Trump Warns Iran on Hormuz Strait

Web Summary : Ahead of Islamabad talks, Trump warned Iran against charging fees in the Hormuz Strait during the ceasefire. He stated oil flow will resume with or without Iranian assistance, despite recent agreement. Trump also mentioned discussing easing sanctions with Iran, signaling potential peace.