रशियन विमानात तांत्रिक बिघाड, २३८ प्रवाशांचे प्राण संकटात, आपातकालीन लँडिंगची तयारी, काय होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 15:15 IST2026-01-23T15:09:16+5:302026-01-23T15:15:52+5:30
Russian Airplane News: रशियामधील अजूर एअरच्या बोईंग ७५७ या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला असून, या विमानामधून प्रवास करत असलेल्या २३८ प्रवाशांचे प्राण संकटात सापडले आहेत.

रशियन विमानात तांत्रिक बिघाड, २३८ प्रवाशांचे प्राण संकटात, आपातकालीन लँडिंगची तयारी, काय होणार?
रशियामधील अजूर एअरच्या बोईंग ७५७ या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला असून, या विमानामधून प्रवास करत असलेल्या २३८ प्रवाशांचे प्राण संकटात सापडले आहेत. चीनवरून उड्डाण करत असताना या विमानाने आपातकालीन संदेश पाठवले आहेत. तसेच या विमानाच्या आपातकालीन लँडिंगची तयारी सुरू करण्यात आली आहे.
रशियन आणि चिनी सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या विमानात २३८ प्रवासी असून, झेडएफ-२९९८ या क्रमांकाच्या या विमानाने सुमारे चार तासांपूर्वी थायलंडमधून उड्डाण केलं होतं. त्यनंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड किंवा इतर बिघाडामुळे वैमानिकाला आपातकालीन संदेश पाठवावा लागला.
या विमान कंपनीच्या जनसंपर्क विभागाने सांगितले की, या विमानाचं चीनमधील लान्झू विमानतळावर आपातकालीन लँडिंग करण्याची तयारी सुरू आहे. तसेत कंपनीच्या संबंधित सेवा परिस्थितीतीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती जनसंपर्क विभागाने दिली आहे. दरम्यान, लान्झू या विमानाला सुरक्षितरीत्या उतरवण्यासाठी विमानतळावर आपातकालीन सेवांना अलर्टवर ठेवण्यात आलं आहे.
रशियन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार अजूर एअरचं बोईंग ७५७ या विमानाने आपलं नियमित उड्डाण केलं होतं. तेवढ्यात वैमानिकाला अचानक डिस्ट्रेस सिग्नल पाठवावा लागला. या विमानातून २३८ प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळे प्रकरण अधिकच गंभीर झालं.