तालिबानी सैनिक सीमेकडे सरसावले, पाकिस्तानने पेशावर आणि क्वेटा येथून सैन्य पाठवले, कधीही युद्ध सुरू होऊ शकते
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 17:22 IST2024-12-27T17:18:38+5:302024-12-27T17:22:40+5:30
काही दिवसापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने नुकतेच वझिरीस्तानच्या माकिन भागात ३० पाकिस्तानी लष्करी सैनिकांना ठार केले तेव्हा पाकिस्तानने हवाई हल्ला केला. त्यावेळी पाकिस्तानने आपल्या सैनिकांची हत्या सहन करणार नाही हा संदेशच दिला होता.

तालिबानी सैनिक सीमेकडे सरसावले, पाकिस्तानने पेशावर आणि क्वेटा येथून सैन्य पाठवले, कधीही युद्ध सुरू होऊ शकते
काही दिवसापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याने त्यात आणखी भर पडली आहे. १५ हजार तालिबानी सैनिक पाकिस्तानच्या दिशेने जात आहेत. दरम्यान, पाकिस्तानी लष्कर आणि हवाई दलाने पेशावर आणि क्वेटा येथून सैन्य तैनात केल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तानी लष्कराच्या काही तुकड्या अफगाण सीमेवर पोहोचल्या आहेत. मीर अली सीमेजवळ अफगाण तालिबान पोहोचले आहेत. मात्र, अद्याप गोळीबाराची चिन्हे आढळली नसून तैनाती वाढवण्यात आली आहे. दरम्यान, अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने काबूलमधील पाकिस्तानी दूतावासाच्या प्रभारींना समन्स बजावले आहे.
भारताविरुद्ध मोठा कट; पाकिस्तानने 250 किलो RDX आणि 100 AK47 बांग्लादेशात पाठवले
अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हाफिज झिया अहमद यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि हा दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले.
तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने नुकतेच वझिरीस्तानच्या माकिन भागात ३० पाकिस्तानी लष्करी सैनिकांना ठार केल्याने हा वाद आणखीनच वाढला आहे.
अफगाण तालिबानकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दुर्गम भागात लपण्याची क्षमता आहे. त्यांच्याकडे AK-47, मोर्टार, रॉकेट लाँचर यांसारख्या आधुनिक शस्त्रांचा मोठा साठा आहे.
पाकिस्तान आधीच आर्थिक संकटात
शेहबाज शरीफ सरकार आधीच आर्थिक संकट, CPEC प्रकल्पाला होणारा विलंब आणि बलुचिस्तानमधील फुटीरतावाद यासारख्या समस्यांशी झुंजत आहे. या मुद्द्यांमुळे सरकार आणि लष्कर दोघेही कमजोर झाले आहेत. आता तालिबानसोबतच्या संघर्षामुळे हे संकट आणखी वाढले आहे.
कोणत्याही मोठ्या लष्करी शक्तीपुढे झुकणार नाहीत, असं अफगान आणि तालिबानने दाखवून दिले आहे.त्यांनी अमेरिका आणि रशियासारख्या महासत्तांना वर्षानुवर्षे आव्हान दिले आणि शेवटी त्यांना अफगाणिस्तानातून परत जाण्यास भाग पाडले. तालिबान विरोधात लढण्यासाठी लष्करी ताकद किंवा आर्थिक क्षमता पाकिस्तानकडे नाही.
मीर अली सीमेवर वाढत्या हालचालींमुळे पाकिस्ताननेही आपल्या लष्कराला सतर्क केले आहे. सीमावर्ती भागात सैन्याची तैनाती वाढवण्यात आली आहे. स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून, या परिस्थितीमुळे मोठा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.