तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 00:30 IST2025-10-12T00:30:13+5:302025-10-12T00:30:42+5:30
Taliban Pakistan Clash : काल पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानमधील काबूलमध्ये एअर स्ट्राईक केल्यानंतर आज तालिबानने पाकिस्तानवर जोरदार पलटवार केला आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सीमारेषेवर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये भीषण संघर्षाला तोंड फुटले आहे.

तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू
काल पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानमधील काबूलमध्ये एअर स्ट्राईक केल्यानंतर आज तालिबाननेपाकिस्तानवर जोरदार पलटवार केला आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सीमारेषेवर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये भीषण संघर्षाला तोंड फुटले आहे. सीमेनजीकच्या भागात रॉकेट, मोर्टार आणि हेवी मशीनगनद्वारे हल्ले केले जात आहेत. तसेच या शस्त्रांच्या आवाजाने सीमाभाग दणाणून जात आहेत.
अफगाणी सैन्याने पाकिस्तानच्या अनेक चौक्यांवर हल्ला केला असून, या संघर्षात ५ पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचे वृत्त आहे. तसेच पाकिस्तानच्या काही चौक्यांवर तालिबानने कब्जा केला आहे. दरम्यान, अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने या संघर्षाबाबत मोठा दावा केला आहे. अफगाणिस्तानने प्रत्युत्तरदाखल केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानच्या दोन चौक्या नष्ट झाल्या आहेत. तसेच नंगरहार आणि कुनार प्रांतामध्येही पाकिस्तानच्या अनेक चौक्यांवर अफगाणी सैन्याने कब्जा केला आहे. काल पाकिस्तानने टीटीपीला लक्ष्य करत केलेल्या एअरस्ट्राईकनंतर तालिबानन हे प्रत्युत्तरदाखल हल्ले केले आहेत.