तालिबानकडून शाळा-कॉलेजमध्ये मुलींना शिकण्यास परवानगी, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 13:00 IST2021-09-06T12:59:19+5:302021-09-06T13:00:59+5:30
Taliban in Afghanistan:तालिबानने शाळा-कॉलेजमध्ये मुलींना शिकण्यास परवानगी दिली आहे. पण, एक मोठी नियमावली जारी केली आहे.

तालिबानकडून शाळा-कॉलेजमध्ये मुलींना शिकण्यास परवानगी, पण...
काबुल:अफगाणिस्तानात सत्ता मिळवल्यानंतर महिलांसाठी तालिबानचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. तालिबानने आता विद्यापीठांमध्य शिकणाऱ्या मुलींसाठी एक हुकूम जारी केला आहे. तालिबानच्या आदेशानुसार, मुलींना कॉलेजमध्ये पूर्ण शरीर झाकण्यासाठी अबाया आणि नकाब घालावं लागणार आहे.
Afghanistan Taliban Crisis : क्रूरतेचा कळस! महिला पोलीस अधिकारी 6 महिन्यांच्या होत्या गर्भवती, पती आणि मुलांसमोरच....#Taliban#AfganistanWomen#afgahnistan#TalibanTerrorhttps://t.co/WHLONH6C1c
— Lokmat (@MiLOKMAT) September 6, 2021
यासोबतच, मुला-मुलींसाठी स्वतंत्रपणे वर्ग चालवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. स्वतंत्र वर्ग चालवता येत नसतील, तर मुला-मुलींना स्वतंत्र रांगेत बसवून त्यांच्या मध्ये एक मोठा पडदा लावला जाईल. तसेच, मुलींना शिकवण्यासाठी महिला शिक्षिका ठेवण्यात याव्या आणि हे शक्य नसेल, तर एखाद्या वृद्ध पुरुष शिक्षकाची नियुक्ती करावी, असे तालिबानच्या आदेशात सांगण्यात आले आहे.
सोव्हिएत रशियाच्या फौजांनाही जिंकता न आलेला पंजशीर हरला आहे. सात पैकी पाच जिल्ह्यांवर त्यात राजधानी तालिबानच्या ताब्यात गेली आहे. पंजशीरच्या लढवय्यांना वालीच उरला नाही. #PanjshirValley#Taliban#Afghanistanhttps://t.co/NgNpMSWUFs
— Lokmat (@MiLOKMAT) September 6, 2021
एनआरएफकडून तालिबानच्या दाव्याचे खंडन
अफगाणिस्तानातील तालिबानाविरोधी संघटना नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट (एनआरएफ) ने तालिबानचा पंजशीरवर कब्जा केल्याचा दावा चुकीचा असल्याचे म्हटले आहे. पंजशीरचा तालिबानचा ताबा चुकीचा आहे. आमचे कमांडर अजूनही महत्त्वाच्या पदांवर तैनात असून, आमचे सैनिकही पंजशीर खोऱ्यात वेगवेगळ्या ठिकाणी तालिबानचा सर्व ताकतीने सामना करत आहेत, असे स्पष्टीकरण त्यांच्याकडून देण्यात आले आहे.