नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 17:01 IST2025-10-11T16:59:49+5:302025-10-11T17:01:58+5:30
मचाडोचे अमेरिकन उजव्या विचारसरणीशी जवळचे संबंध आहेत. व्हाईट हाऊसनेही त्यांच्या नोबेलवर टीका केली आहे. समितीने हा पुरस्कार देताना राजकारणाला शांततेपेक्षा वरचढ स्थान दिले आहे', असा आरोप व्हाईट हाऊसने केला.

नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
नोबेल पारितोषिक समितीने यंदाचा २०२५ चा शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर केला आहे. त्यांच्यावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव झाला, तर दुसरीकडे अनेक संघटनांनी हा पुरस्कार मागे घेण्याची मागणी केली. व्हेनेझुएलामध्येही शांतता पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. देशात लोकशाही पुनर्संचयित करण्यासाठी अहिंसक संघर्ष केल्याबद्दल त्यांना या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवडण्यात आले. दरम्यान, डाव्या विचारसरणीचे विचारवंत आणि राजकीय विरोधक त्यांना विरोध करताना दिसत आहेत.
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही
मचाडोचे अमेरिकन उजव्या विचारसरणीशी जवळचे संबंध आहेत. व्हाईट हाऊसनेही त्यांच्या नोबेलवर टीका केली आहे. समितीने हा पुरस्कार देताना राजकारणाला शांततेपेक्षा वरचढ स्थान दिले आहे', असा आरोप व्हाईट हाऊसने केला.
व्हेनेझुएलाचे लोक त्यांच्या नोबेलवर खूश आहेत कारण त्यांना वाटते की यामुळे त्यांना अमेरिकेत हद्दपार होण्याचा धोका कमी होईल. 'मचाडो व्हेनेझुएलाच्या सरकारविरुद्ध परदेशी निर्बंधांना पाठिंबा देतात आणि म्हणूनच त्यांना नोबेल मिळू नये, असा अनेकांचा युक्तिवाद आहे.
नोबेल समितीने हा पुरस्कार रद्द करावा
अमेरिकेतील मुस्लिम नागरी हक्क गट असलेल्या कौन्सिल ऑन अमेरिकन-इस्लामिक रिलेशन्स (CAIR) नेही या निर्णयावर टीका केली आणि नोबेल समितीने हा पुरस्कार रद्द करावा असे म्हटले. व्हेनेझुएलाच्या सत्ताधारी पक्षाच्या एका कायदेकर्त्याने नोबेल हा एक लाजिरवाणा निर्णय असल्याचे म्हटले. "त्यांनी परदेशी शक्तींच्या मदतीने देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण केले," असे ते म्हणाले.
'मचाडो इस्रायलच्या मुस्लिमविरोधी अजेंडाचे समर्थन करतात. मुस्लिमांवरील अत्याचारांना त्या उघडपणे समर्थन देतात. व्हेनेझुएलाचे माजी उपराष्ट्रपती पाब्लो इग्लेसियास म्हणाले की, मचाडो देशात सत्तापालट करण्याचा प्रयत्न करत होते. त्या अॅडॉल्फ हिटलरच्या विचारसरणीला समर्थन देतात. "पुतिन आणि झेलेन्स्की पुढील वर्षी नोबेल शांतता पुरस्कार जिंकतील अशी शक्यता आहे, असंही ते म्हणाले.