प्राणी संग्रहालयाच्या पिंजऱ्यातून पळून गेले पाच वाघ आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 10:41 IST2022-11-03T10:41:04+5:302022-11-03T10:41:32+5:30
रिपोर्टनुसार, काही लोकांना एक वाघ आणि चार बछडे सकाळी पिंजऱ्यातून बाहेर आलेले पाहिले. याची सूचना मिळताच प्राणी संग्रहालयात एकच गोंधळ झाला.

प्राणी संग्रहालयाच्या पिंजऱ्यातून पळून गेले पाच वाघ आणि मग....
Five lions suddenly escaped from Sydney Zoo : ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये बुधवारी सकाळी एक खळबळजनक घटना घडली. इथे सिडनीतील टारोंगा प्राणी संग्रहालयात बुधवारी पाच वाघ आपल्या पिंजऱ्यातून बाहेर निघाले. धोका ओळखून अधिकाऱ्यांनी या भागात इमरजन्सी लॉकडाऊन लावला. सुदैवाने काही तासांनंतर पाचही वाघांना पकडण्यात आलं. आता स्थिती सामान्य आहे.
रिपोर्टनुसार, काही लोकांना एक वाघ आणि चार बछडे सकाळी पिंजऱ्यातून बाहेर आलेले पाहिले. याची सूचना मिळताच प्राणी संग्रहालयात एकच गोंधळ झाला. प्राणी संग्रहालयाचे अधिकारी सायमन डफी यांनी सांगितलं की, प्राणी आल्याची सूचना मिळताच इमरजन्सी लॉकडाऊन लावण्यात आला होता. काही वेळानंतर चार बछड्यांना सहजपणे पिंजऱ्यात बंद करण्यात आलं. तर वयस्क वाघाला पकडण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली. नंतर त्यालाही पिंजऱ्यात बंद करण्यात आलं. वाघ पिंजऱ्यातून बाहेर कसे आले याचा शोध घेतला जात आहे.
त्यांनी सांगितलं की, वाघ पिंजऱ्यातून बाहेर आल्याची सूचना मिळताच. एक मोठा धोक्याचा अलार्म वाजवण्यात आला. ज्यानंतर परिसरात लॉकडाऊन लागू झाला. या प्राणी संग्रहालयात मुक्कामी आलेल्या एका व्यक्तीने सांगितलं की, वाघ बाहेर निघाल्याने त्यांना टेन्ट सोडून पळण्यास सांगण्यात आलं. तारोंगा प्राणी संग्रहालयाकडून सांगण्यात आलं की, आता स्थिती नियंत्रणात आहे.
तारोंगा प्राणी संग्रहालयाकडून सांगण्यात आलं की, अशा घटना हाताळण्यासाठी तारोंगा प्राणी संग्रहालयात सुरक्षा व्यवस्था आहे. वाघ बाहेर आल्याची सूचना मिळताच लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. कुणालाही काही इजा झाली नाही. दरम्यान 2009 मध्ये सिडनीच्या मोगो प्राणी संग्रहालयातून एक वाघिण तिच्या पिंजऱ्यातून पळाली होती. लोकांना होणारा धोका ओळखून तिच्यावर गोळी झाडून तिला मारण्यात आलं होतं.