शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

Sushant Singh Rajput Suicide: 'सच्चा मित्र गमावला', सुशांतच्या निधनाने इस्रायल झालं भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 17:09 IST

Sushant Singh Rajput Suicide: सुशांतच्या निधनाची बातमी समजल्यावर इस्रायलही भावूक झाला आहे. आम्ही सच्चा मित्र गमावला असल्याची भावना इस्रायलने व्यक्त केली आहे.

छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत यशस्वी प्रवास करणाऱ्या सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला. सुशांतच्या आत्महत्ये मागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतवर मानसोपचार सुरू होते. त्याबद्दलची काही कागदपत्रदेखील त्याच्या घरात पोलिसांनी सापडली. त्यामुळे नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचललं असावं, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर अनेकांनी सुशांतचा फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

सुशांतच्या निधनाची बातमी समजल्यावर इस्रायलही भावूक झाला आहे. आम्ही सच्चा मित्र गमावला असल्याची भावना इस्रायलने व्यक्त केली आहे. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाचे उपमहासंचालक गिलाद कोहेन यांनी ट्विटरवर सुशांतच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. गिलाद यांनी सुशांतच्या 'ड्राइव्ह' चित्रपटातील मखना या गाण्याची लिंक शेअर करत त्याला आदरांजली वाहिली आहे. तसेच इस्रायलने सच्चा मित्र असलेल्या सुशांतसिंह राजपूतच्या निधनावर दु:ख व्यक्त करत असल्याचं म्हटलं आहे.

सुशांतची कायम आठवण येणार असल्याचं देखील ट्विटमध्ये सांगितलं आहे. इस्रायलमध्ये सुशांत आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस यांच्या एका गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले होते. त्यावेळी सुशांत त्याच्या टीमसह तेथे गेला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. सुशांतने रविवारी सकाळी त्याच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या घरातून पोलिसांनी कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. मध्यरात्री त्याने एका अभिनेत्याला शेवटचा फोन केला होता. मात्र त्या अभिनेत्याने फोन उचलला नाही. त्यामुळे दोघांचं बोलणं होऊ शकलं नाही. सुशांतला गेल्या 6 महिन्यांपासून नैराश्याने ग्रासल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

रविवारी सकाळी दहाच्या सुमारास सुशांतनं ज्युस मागवला. त्यानंतर तो त्याच्या खोलीत गेला. सुशांत बराच वेळ बाहेर आला नाही. त्यामुळे त्याच्या मित्रांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला. पण दरवाजा लॉक होता. अखेर घरातील नोकरांनी चावी तयार करणाऱ्याला बोलावलं. त्यानंतर दार उघडण्यात आलं. त्यावेळी सुशांतचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर नोकरांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. सुशांतच्या वांद्रे येथील घरात चार जण राहतात. त्यामध्ये दोन आचारी, एक नोकर आणि एका आर्ट डिझायनराचा समावेश आहे. हा आर्ट डिझायनर सुशांतचा मित्र आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : लढ्याला यश! औषध किंवा लस नाही तर आता 'या' थेरेपीने होणार कोरोनाग्रस्तांवर उपचार?

अलर्ट! चीनी अ‍ॅपचा वापर करताय?; बसू शकतो मोठा फटका, जाणून घ्या धोका

तब्बल 21 महिने झाले तरी वडिलांनी केले नाहीत मुलावर अंत्यसंस्कार; 'हे' आहे कारण 

CoronaVirus News : अरे व्वा! साडी खरेदीवर महिलांना मिळतंय खास 'कोरोना कवच'; जाणून घ्या 'हे' नेमकं आहे तरी काय? 

CoronaVirus News : 'त्याच्या' जिद्दीला सलाम! आईचं औषध अन् भावंडांच्या शिक्षणासाठी उचलतोय कोरोनाग्रस्तांचे मृतदेह

Today's Fuel Price : इंधन दरवाढीचा भडका! सलग बाराव्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले

CoronaVirus News : बापरे! 'या' व्यक्तींसाठी कोरोना ठरतोय जीवघेणा; 12 पट अधिक आहे मृत्यूचा धोका

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतIsraelइस्रायलSuicideआत्महत्याDeathमृत्यूPoliceपोलिस