शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
4
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
5
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
6
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
7
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
8
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
9
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
11
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
12
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
13
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
14
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
15
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
16
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
17
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
18
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
19
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
20
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन

आश्चर्य! कॅनडामध्ये अवघ्या चार दिवसांत गायब झाली नदी

By admin | Published: April 19, 2017 4:53 PM

कॅनडातील सर्वात मोठी ग्लेशियर्स (हिमनदी)पैकी एक मोठी नदी अवघ्या चार दिवसांत गायब झाली आहे.

ऑनलाइन लोकमतओटावा, दि. 19 - कॅनडातील सर्वात मोठी ग्लेशियर्समधील एक मोठी नदी अवघ्या चार दिवसांत गायब झाली आहे. यामुळे हवामान आणि जल अभ्यासकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. गायब झालेल्या "स्लिम्स नदी"ची रुंदी काही ठिकाणी तब्बल 150 मीटर इतकी मोजण्यात आली होती. कॅनडातल्या युकून प्रांतात विशाल कास्कावुल्श ग्लेशियरपासून उत्पत्ती झालेली ही स्लिम्स नदी अनेक वर्षांपासून वाहत होती. मात्र गेल्या वर्षी हे ग्लेशियरजवळील बर्फ वेगाने वितळल्याने आलेलं पाणी अलेस्क या दुसऱ्याच नदीमध्ये मिसळून अलास्काच्या आखाताकडे गेले आहे. मूळ ग्लेशियरपासून हे ठिकाण हजारो किमी दूरवर आहे. ग्लेशियरचे पाणी याआधी स्लिम व अलेस्क या नद्यांमध्ये जात असत. मात्र यावेळी सर्व पाणी एकाच नदीद्वारे प्रशांत महासागरात जाऊन मिळाल्याचं आढळून आल्याचं निरीक्षण ग्लेशियरचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या पथकाने केलं आहे. शास्त्रज्ञांना नदी पूर्णत: कोरडी पडल्याचे आढळून आले आहे. दिशा बदलून दुसऱ्याच मार्गाने नदीचा प्रवाह वाहू लागल्याच्या प्रकारास शास्त्रज्ञांनी "रिव्हर पायरसी" असे संबोधले आहे. स्लिम्स नदीबाबतही हाच प्रकार घडल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आल्याचंही शास्त्रज्ञ म्हणाले आहेत. भूतकाळामध्ये याआधी रिव्हर पायरसी घडल्याचे पुरावे सापडले आहेत. मात्र सद्यस्थितीत असा प्रकार घडल्याचे निदर्शनास आलेले नाही. रिव्हर पायरसीचा अभ्यास करण्यासाठी हजारो वा लक्षावधी वर्षांपूर्वीच्या भौगोलिक घटकांचा मागोवा घ्यावा लागतोय. मात्र रिव्हर पायरसीची ही घटना 21व्या शतकात पहिल्यांदाच घडली आहे, असे या अभ्यास प्रकल्पाचे नेतृत्व करणारे भूगर्भशास्त्रज्ञ डॅन शुगर म्हणाले आहेत. चार दिवसांत एक नदी अक्षरश: गायब झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर, जागतिक हवामान बदलाचे आव्हान आणि व्याप्ती आपल्या धारणेपेक्षा अत्यंत गंभीर असल्याचं मतंही शास्त्रज्ञांनी नोंदवलं आहे.