काबूलमध्ये विमानतळाजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, 10 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2018 19:07 IST2018-07-22T19:02:07+5:302018-07-22T19:07:17+5:30
अफगाणिस्तानच्या काबूल येथील हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

काबूलमध्ये विमानतळाजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, 10 जणांचा मृत्यू
काबूल - अफगाणिस्तानच्या काबूल येथील हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून मृतांचा आकडा वाढणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. येथील पोलीस यंत्रणांना हा आत्मघाती हल्ला असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
येथील हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेरील परिसरात आत्मघाती हल्ला झाला. त्यामध्ये 10 नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहेत. हल्ल्यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. या घटनेनंतर स्थानिक पोलीस प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच वेगात बचाव आणि मदतकार्य सुरु आहे.