Suicide blast in Pakistan: वायव्य पाकिस्तानात दहशतवाद्यांनी पोलिसांची गाडीच आत्मघाती बॉम्बस्फोटात उडवली. या घटनेत दोन पोलीस ठार झाले. तर तीन नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी रात्री खैबर पख्तुनवामध्ये ही घटना घडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पोलीस अधीक्षक मसूद बानगश यांना सांगितले की, पेशावर जिल्ह्यातील चमकानी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. रिंग रोडवर असलेल्या जनावरांच्या बाजाराजवळ असलेल्या पोलिसांच्या गाडीलाच लक्ष्य करण्यात आले.
वाचा >>पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
पोलिसांच्या गाडीजवळच आत्मघाती बॉम्बस्फोट करण्यात आला. यात दोन पोलीस जागीच ठार झाले, तर तीन नागरिक गंभीर जखमी झाले. खैबर पख्तुनवाचे मुख्यमंत्री अली अमीन गांदापूर यांनी या हल्ल्याचा निषेध केला. आणि या हल्ल्याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
"जनतेच्या संरक्षण करणाऱ्या सुरक्षारक्षकांवर आणि मालमत्तांवरील भ्याड हल्ला निषेधार्ह आहे. अशा भ्याड हल्ल्याने पोलीस दलाचे मनोधैर्य खचणार नाही", असे ते म्हणाले.