शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

मक्कातील मशिदीत आत्मघातकी हल्ल्याचा कट उधळला

By admin | Published: June 24, 2017 8:50 AM

मक्कातील काबा येथील मशिदीला निशाणा करुन घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असणा-या एका दहशतवाद्याचा कट उधळून लावण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत

रियाद, दि. 24 - मक्कातील काबा येथील मशिदीला निशाणा करुन घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असणा-या एका दहशतवाद्याचा कट उधळून लावण्यात आला आहे. सौदी अरेबियाच्या गृहमंत्रालयातील एका प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, येथील निवासी इमारतीत घुसलेल्या एका आत्मघातकी हल्लेखोराला सुरक्षा रक्षकांनी घेरले. मात्र यानंतर त्यानं लगेचच स्वतःलाच स्फोटाद्वारे उडवलं.  
 
या घटनेत इमारत कोसळल्यानं पोलीस कर्मचा-यांसहीत 11 जण जखमी झाले आहेत. सोदी अरेबियाच्या गृह मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार,  या घटनेनंतर अन्य पाच संशयित दहशतवाद्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. 
 
रमजानच्या शेवटच्या दिवसात जगभरातील लाखो मुस्लिम मक्का येथे दाखल झाले आहेत. दरम्यान सौदी अरेबियातील अधिका-यांनी दहशतवाद्यांच्या या अयशस्वी हल्ल्याबाबत अन्य कोणताही तपशील जारी केलेला नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसांत सौदी अरेबियामध्ये अनेक गंभीर स्वरुपाचे हल्ले झाले आहेत. ज्यातील काही हल्ले इसिसनं घडवून आणल्याचं बोलले जात आहे. 
 
अधिकतर येथील शिया समुदाय आणि सुरक्षारक्षकांना टार्गेट करुन हल्ले केले जातात. जुलै 2016मध्ये मदीना येथे पैगंबर मोहम्मद यांच्या मशिदीवर  झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात चार सुरक्षा कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे. 
 
 
दरम्यान, शुक्रवारी पाकिस्तानमध्ये झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटात जवळपास 18 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जखमी झाले आहेत. अफगाणिस्तान सीमारेषेजवळ असणा-या कुर्रम जिल्ह्यातील परचिनार परिसरात हे स्फोट झाले. वर्दळीच्या ठिकाणी एका मार्केटमध्ये हे स्फोट घडवण्यात आले. या परिसरात आदिवासींची संख्या जास्त आहे. 
 
 
पहिला स्फोट अकबर खान मार्केटमध्ये झाला. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईद आणि इफ्तारची शॉपिंग करण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असतानाच हा स्फोट झाला. पहिला स्फोट झाल्यानंतर उपस्थितांनी जखमींच्या मदतीसाठी धाव घेतली असता दुसरा स्फोट झाला.