विमानातून अचानक धूर... तुर्कीचे C-130 जॉर्जियात कोसळले; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:03 IST2025-11-12T15:02:58+5:302025-11-12T15:03:40+5:30

Turkish C-130 crashed video: हे विमान तुर्की-अझरबैजान सीमेजवळील जॉर्जियाच्या पूर्व काखेती प्रदेशात कोसळले.

Suddenly smoke from airplane Turkish C-130 crashes in Georgia Shocking VIDEO goes viral 20 feared dead | विमानातून अचानक धूर... तुर्कीचे C-130 जॉर्जियात कोसळले; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

विमानातून अचानक धूर... तुर्कीचे C-130 जॉर्जियात कोसळले; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Turkish C-130 crashed video: जॉर्जियामध्ये तुर्कीचे C-130 लष्करी मालवाहू विमान कोसळले. विमानाने अझरबैजानहून उड्डाण केले होते आणि त्यात २० जण होते. मृतांची किंवा जखमींची संख्या अद्याप समजलेली नाही. बचाव पथके तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आली. विमानातील सर्व २० जणांचा मृत्यू झाले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, विमानात तुर्की आणि अझरबैजान या दोन्ही देशांचे लोक असू शकतात, परंतु त्यांची संख्या अस्पष्ट आहे. हे विमान तुर्की-अझरबैजान सीमेजवळील जॉर्जियाच्या पूर्व काखेती प्रदेशात कोसळले.

तुर्की-अझरबैजानने तपास सुरू केला

तुर्कीचे अध्यक्ष तैय्यप एर्दोगान यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली. अझरबैजानचे अध्यक्ष इल्हम अलीयेव यांनी एर्दोगान यांच्याशी चर्चा केली. तुर्की आणि जॉर्जियन दोन्ही सरकारांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अपघाताच्या व्हिडिओमध्ये विमान डोंगरावर आदळण्यापूर्वी पांढऱ्या धुराचे लोट सोडताना दिसत आहे. अपघातानंतर काळ्या धुराचे लोटही उठताना दिसत आहेत. पाहा व्हिडीओ-

C-130 लष्करी वाहतूक विमान

C-130 हरक्यूलिस विमान हे अमेरिकन कंपनी लॉकहीड मार्टिनने बनवले आहे. हे चार इंजिन असलेले टर्बोप्रॉप लष्करी वाहतूक विमान आहे, जे कुठल्याही धावपट्टीवरून उड्डाण आणि उतरण्यासाठी डिझाइन केलेले आहे. त्याचा प्राथमिक उद्देश मालवाहू, सैन्य आणि उपकरणे वाहतूक करणे आहे. C-130 चा वापर गनशिप, एअरबोर्न हल्ला आणि टोही मोहिमांसाठी देखील केला जातो. जगभरातील अनेक सैन्यांसाठी हे प्राथमिक सामरिक विमान मानले जाते. तुर्की सरकारने अद्याप अपघाताचे कारण किंवा त्यावरील लोकांच्या राष्ट्रीयत्वाबाबत कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.

Web Title : तुर्की का C-130 विमान जॉर्जिया में दुर्घटनाग्रस्त; दिल दहला देने वाला वीडियो सामने आया

Web Summary : तुर्की का एक C-130 सैन्य मालवाहक विमान जॉर्जिया में तुर्की-अज़रबैजान सीमा के पास दुर्घटनाग्रस्त हो गया। विमान में 20 लोग सवार थे, और दुर्घटना से पहले उसमें से सफेद धुआं निकल रहा था। तुर्की और अज़रबैजान की सरकारों ने जांच शुरू कर दी है। विमान में सवार सभी 20 लोगों के मारे जाने की आशंका है।

Web Title : Turkish C-130 Crashes in Georgia; Chilling Video Surfaces

Web Summary : A Turkish C-130 military cargo plane crashed in Georgia near the Turkish-Azerbaijan border. The plane, carrying 20 people, emitted white smoke before crashing. Turkish and Azerbaijani governments have initiated investigations. All 20 on board are feared dead.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.