शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
2
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
3
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
4
मिचेल स्टार्कचा भेदक मारा, राहुल त्रिपाठी लढला! KKR समोर SRH २० षटकंही नाही टिकला
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

‘नासा’च्या मिशनमध्ये भारतीय वंशाच्या सुबाशिनी अय्यर, चंद्रावर मनुष्य उतरवण्याच्या प्रोजेक्टमध्ये महत्त्वाची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2021 8:34 AM

Subashini Iyer : भारतीय वंशाच्या इंजिनीअर सुबाशिनी अय्यर या नासाच्या आर्टिमिस मिशनमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. या मिशनमध्ये चंद्रावर नासा पुन्हा एकदा मनुष्याला उतरविण्याचा प्रयत्न करणार आहे.

मेलबर्न / वॉशिंग्टन : भारतीय वंशाचे अनेक वैज्ञानिक अमेरिकन स्पेस एजन्सी ‘नासा’मध्ये मोठी कामगिरी करताना दिसत आहेत. या यादीत आता भारताची कन्या सुबाशिनी अय्यर यांचे नाव जोडले गेले आहे. नासाच्या महत्त्वपूर्ण अशा आर्टिमिस मिशनमध्ये त्या मदत करणार आहेत. भारतीय वंशाच्या इंजिनीअर सुबाशिनी अय्यर या नासाच्या आर्टिमिस मिशनमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. या मिशनमध्ये चंद्रावर नासा पुन्हा एकदा मनुष्याला उतरविण्याचा प्रयत्न करणार आहे. या मिशनमध्ये सुबाशिनी अय्यर रॉकेटच्या कोर स्टेजचे काम सांभाळत आहेत. आर्टिमिस मिशन ही नासाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. याच्या पहिल्या टप्प्याची देखरेख इंजिनीअर सुबाशिनी अय्यर करत आहेत.नासाच्या मिशन आर्टिमिस १ मध्ये चंद्रावर स्पेसक्राफ्ट ओरियन जाणार आहे. ते पृथ्वीपासून जवळपास ४ लाख ५० हजार किमीचे अंतर पार करणार आहे. ही मोहीम तीन आठवड्यांची आहे. २०२४ मध्ये आर्टिमिस - २ मिशनअंतर्गत मनुष्याला चंद्रावर पाठविण्यात येणार आहे. सुबाशिनी अय्यर नासाच्या आर्टिमिस -१ मिशनच्या लाँच इंटिग्रेटेड प्रोडक्ट टीमचे नेतृत्व करत आहेत. ‌(वृत्तसंस्था)

कोण आहेत सुबाशिनी?

-  सुबाशिनी अय्यर तामिळनाडूमधील कोईम्बतूर येथे जन्मलेल्या आहेत. - १९९२ मध्ये त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केली. गत दोन वर्षांपासून त्या नासाच्या मून मिशनमध्ये स्पेस लाँच सिस्टीम म्हणजे, एसएलसी प्रोजेक्टवर काम करत आहेत.

टॅग्स :NASAनासाAmericaअमेरिकाIndiaभारत