शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

होर्मुज पेच: जपानचा युद्धनौका पाठवण्यास नकार; मॅक्रॉन यांचा इराणला फोन गेला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 09:48 IST

Strait of Hormuz Crisis Update: जपानने होर्मुजमध्ये नौदल पाठवण्यास नकार दिला आहे. ट्रम्प आंतरराष्ट्रीय युतीची घोषणा करण्याची शक्यता. मॅक्रॉन आणि इराणच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये चर्चा. वाचा सविस्तर.

मध्य पूर्वेकडील तणाव शिगेला पोहोचला असताना 'होर्मुजच्या सामुद्रधुनी'वरून जागतिक राजकारण चांगलेच तापले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्रराष्ट्रांना लष्करी मदतीचे आवाहन केले असले, तरी जपानने तूर्त आपल्या युद्धनौका या भागात पाठवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. दुसरीकडे, फ्रान्स आणि ब्रिटनने मुत्सद्दी मार्गाने हा तिढा सोडवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

जपानच्या पंतप्रधानांनी संसदेत स्पष्ट केले की, होर्मुजमध्ये तेल टँकर्सच्या सुरक्षेसाठी युद्धनौका पाठवण्याचा सध्या कोणताही विचार नाही. "आम्ही सध्या कायदेशीर चौकटीत राहून काय शक्य आहे, याचा अभ्यास करत आहोत," असे सांगत जपानने लष्करी सहभागापासून स्वतःला दूर ठेवले आहे. जपानची अर्थव्यवस्था आखाती तेलावर अवलंबून असूनही त्यांनी घेतलेली ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.

मॅक्रॉन-पेजेशकियन यांच्यात चर्चाफ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांच्याशी फोनवर चर्चा केली. होर्मुजमधील वाहतुकीचे स्वातंत्र्य तातडीने बहाल करण्यात यावे, अशी मागणी मॅक्रॉन यांनी केली. "वाढत्या लष्करी हालचाली संपूर्ण प्रदेशाला अराजकतेकडे ढकलू शकतात, ज्याचे परिणाम अनेक वर्षे भोगावे लागतील," अशी चेतावणीही त्यांनी दिली.

ट्रम्प यांची 'इंटरनॅशनल अलायन्स'ची योजना'द वॉल स्ट्रीट जर्नल'च्या वृत्तानुसार, ट्रम्प प्रशासन या आठवड्यात होर्मुजसाठी एका 'आंतरराष्ट्रीय युती'ची  घोषणा करू शकते. अनेक देशांनी या जलमार्गाच्या सुरक्षेसाठी एकत्र येण्यास संमती दर्शवल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान किम स्टार्मर यांनीही ट्रम्प यांच्याशी या विषयावर चर्चा केली असून, जागतिक शिपिंगवर होणाऱ्या परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

आर्थिक संकटाची टांगती तलवारब्रिटीश पंतप्रधान स्टार्मर यांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याशीही चर्चा केली आहे. सोमवारी होणाऱ्या बैठकीत आखाती युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि सुरक्षा उपाययोजना यावर सविस्तर चर्चा होणार आहे.कोणाची काय भूमिका?

  • जपान: जपानच्या पंतप्रधानांनी संसदेत स्पष्ट केले की, सध्या युद्धनौका पाठवण्याची कोणतीही योजना नाही. जपान आपल्या स्तरावर कायदेशीर चौकटीत राहून काय शक्य आहे, याचा केवळ अभ्यास करत आहे.

  • ऑस्ट्रेलिया: ऑस्ट्रेलियानेही अमेरिकेची मागणी फेटाळली असून, आपल्या सध्याच्या संरक्षण कटिबद्धतांमुळे या मोहिमेत सहभागी होता येणार नसल्याचे म्हटले आहे.

  • तुर्की: तुर्कीनेही या लष्करी कारवाईत थेट सहभागी होण्यास नकार दिला असून, मुत्सद्दी मार्गाने तोडगा काढण्यावर भर दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Hormuz Strait: Japan Refuses Warships; Macron Calls Iran.

Web Summary : Amidst rising tensions, Japan declines sending warships to Hormuz. Macron urges Iran to ensure free passage. Trump plans international alliance for waterway security, sparking global economic concerns and diplomatic efforts.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरJapanजपानWarयुद्धwar shipयुद्ध नौकाIranइराणLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईFuel Crisisइंधन टंचाई