गाझामध्ये नरसंहार थांबवा,  ‘अरब लीग’चे नेते सरसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 13:29 IST2025-05-18T13:29:06+5:302025-05-18T13:29:30+5:30

गेल्या मार्चमध्ये इजिप्तमध्ये झालेल्या अरब लीग परिषदेत गाझातील सुमारे २० लाख पॅलिस्टिनी नागरिकांना विस्थापित न करता या भागाची पुनर्बांधणी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी  दिली होती. तोच प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला.

Stop the massacre in Gaza, Arab League leaders urge | गाझामध्ये नरसंहार थांबवा,  ‘अरब लीग’चे नेते सरसावले

गाझामध्ये नरसंहार थांबवा,  ‘अरब लीग’चे नेते सरसावले

बगदाद : इराकमध्ये झालेल्या अरब लीगच्या वार्षिक परिषदेत शनिवारी इस्रायल-हमास यांच्यात सुरू असलेला भयंकर संघर्ष थांबवण्यावर सखोल विचार करण्यात आला. तसेच, युद्ध थांबल्यानंतर इस्रायलच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या गाझा पट्टीच्या पुनर्बांधणीचा संकल्प या परिषदेत नेत्यांनी व्यक्त केला.

गेल्या मार्चमध्ये इजिप्तमध्ये झालेल्या अरब लीग परिषदेत गाझातील सुमारे २० लाख पॅलिस्टिनी नागरिकांना विस्थापित न करता या भागाची पुनर्बांधणी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी  दिली होती. तोच प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला. इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल सुदानी यांनी गाझामधील नरसंहार इतिहासातील सर्वांत भयंकर असल्याचे नमूद केले.

... म्हणून परिषदेचे महत्त्व
इस्रायलचे पंतप्रधान बेंझामिन नेत्यान्याहू यांनी पॅलेस्टाइनमध्ये कार्यरत हमास संघटनेचा नायनाट करण्याचा संकल्प केला आहे.
जानेवारीमध्ये इस्रायल-हमास युद्धबंदीची मुदत संपताच इस्रायलने गाझावर प्रचंड हल्ले सुरू केले आहेत.
इस्रायलच्या या हल्ल्यांत रोज कित्येक पॅलेस्टिनींचा मृत्यू होत आहे. या पार्श्वभूमीवर अरब लीगच्या या परिषदेचे वेगळे महत्त्व आहे.

Web Title: Stop the massacre in Gaza, Arab League leaders urge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.