स्टीफन हॉकिंग आणि 'त्या' दोन महिलांच्या व्हायरल फोटोचे सत्य काय? कुटुंबाने अखेर सोडले मौन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 13:17 IST2026-02-26T13:10:19+5:302026-02-26T13:17:25+5:30

एपस्टीन फाईल्समधील 'त्या' वादग्रस्त फोटोंवर स्टीफन हॉकिंग यांच्या कुटुंबाने सोडले मौन

Stephen Hawking and the truth behind the viral photo Family breaks silence on those controversial photos in the Epstein files | स्टीफन हॉकिंग आणि 'त्या' दोन महिलांच्या व्हायरल फोटोचे सत्य काय? कुटुंबाने अखेर सोडले मौन!

स्टीफन हॉकिंग आणि 'त्या' दोन महिलांच्या व्हायरल फोटोचे सत्य काय? कुटुंबाने अखेर सोडले मौन!

Stephen Hawking: प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ दिवंगत प्रोफेसर स्टीफन हॉकिंग यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी जोडल्या जाणाऱ्या कागदपत्रांमुळे चर्चेत आले आहे. दोन महिलांसोबतचा त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या. आता या प्रकरणावर हॉकिंग यांच्या कुटुंबाने स्पष्टीकरण देऊन सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.

काय आहे 'त्या' फोटोमागचे सत्य?

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये स्टीफन हॉकिंग एका सन लाउंजरवर बसलेले असून त्यांच्या बाजूला बिकिनी घातलेल्या दोन महिला हातात कॉकटेल घेऊन उभ्या असल्याचे दिसत आहेत. अमेरिकेच्या न्याय विभागानेप्रसिद्ध केलेल्या एपस्टीनशी संबंधित लाखो कागदपत्रांमध्ये हा फोटो सापडला होता.

हॉकिंग यांच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केले की, "फोटोतील त्या दोन महिला कोणी अनोळखी किंवा गैरकृत्याशी संबंधित नसून, त्या स्टीफन हॉकिंग यांच्या अधिकृत  केअरटेकर होत्या." हॉकिंग यांना मोटर न्यूरॉन आजारामुळे २४ तास वैद्यकीय देखभालीची गरज असे, त्यामुळे ब्रिटनमधून या महिला त्यांच्यासोबत सेंट थॉमस येथे गेल्या होत्या.

२००६ ची ती परिषद आणि एपस्टीनचा संबंध

हा फोटो २००६ मध्ये यूएस व्हर्जिन आयलंडमधील सेंट थॉमस येथील रिट्झ कार्लटन हॉटेलमध्ये काढण्यात आला होता. हॉकिंग तिथे एनर्जी ऑफ एम्प्टी स्पेस दॅट इज नॉट झिरोया विषयावरील एका वैज्ञानिक परिषदेसाठी गेले होते. हॉकिंग यांच्यासह २१ नामवंत शास्त्रज्ञ या परिषदेत सहभागी झाले होते. या भेटीदरम्यान एपस्टीनने एका पानबुडीमध्ये बदल केले होते, जेणेकरून हॉकिंग यांना त्यांच्या शारीरिक मर्यादेनंतरही समुद्राखालच्या जगाचा अनुभव घेता येईल.

व्हर्जिनिया जुफ्रे नावाच्या महिलेने हॉकिंग यांच्यावर लावलेले अनैतिक कृत्यात सहभागाचे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे पुराव्यांवरून समोर आले. खुद्द एपस्टीनने २०१५ मध्ये एका ईमेलमध्ये हे आरोप खोटे असल्याचे सिद्ध करण्याबाबत चर्चा केली होती.

हॉकिंग यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, "प्रोफेसर हॉकिंग यांनी २० व्या शतकातील भौतिकशास्त्रात महान योगदान दिले आहे. ५० वर्षांहून अधिक काळ मोटर न्यूरॉनसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत असतानाही त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले. व्हेंटिलेटर आणि व्हीलचेअरवर अवलंबून असलेल्या व्यक्तीबद्दल अशा प्रकारचे चुकीचे आरोप करणे अत्यंत दुर्दैवी आहे."

Web Title : स्टीफन हॉकिंग और महिलाओं की तस्वीर: परिवार ने एपस्टीन लिंक अफवाहों को स्पष्ट किया।

Web Summary : स्टीफन हॉकिंग के परिवार ने जेफ्री एपस्टीन से जुड़े अफवाहों का खंडन किया। तस्वीर में दिख रही महिलाएं 2006 के सम्मेलन में हॉकिंग की देखभाल करने वाली थीं। अनैतिक आचरण के आरोपों को खारिज कर दिया गया, एपस्टीन ने खुद ईमेल में उन्हें बदनाम किया।

Web Title : Stephen Hawking photo with women: Family clarifies Epstein link rumors.

Web Summary : Stephen Hawking's family refuted rumors linking him to Jeffrey Epstein after a photo surfaced. The women in the photo were Hawking's caretakers during a 2006 conference. Allegations of unethical conduct were dismissed, with Epstein himself discrediting them in emails.