नाईट क्लबमधील पार्टीत पोलिसांच्या छापेमारीदरम्यान चेंगराचेंगरी, 13 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 00:09 IST2020-08-25T00:08:13+5:302020-08-25T00:09:20+5:30
विनाअनुमती पार्टी करणाऱ्या 23 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.

नाईट क्लबमधील पार्टीत पोलिसांच्या छापेमारीदरम्यान चेंगराचेंगरी, 13 जणांचा मृत्यू
पेरूची राजधानी असलेल्या लिमामध्ये शनिवारी कोरोना महामारीशी संबंधित नियमांचे उल्लंघन करत आयोजित करण्यात आलेल्या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकल्यावर चेंगराचेंगरी झाली आहे.
या चेंगराचेंगरीत 13 जणांचा मृत्यू झाला असून 6 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 3 पोलिसांचा समावेश आहे. छापा टाकण्यात आलेल्या नाईट क्लबमध्ये केवळ एकच दरवाजा होता. पोलिसांचा छापा पडतात सर्वजण त्यातूनच बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागल्याने चेंगराचेंगरी झाली आहे. विनाअनुमती, बेकायदेशीररित्या पार्टी करणाऱ्या 23 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.