शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

Sri Lanka Bomb Blasts : श्रीलंकेत पुन्हा दहशतवादी हल्ले होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 09:21 IST

श्रीलंकेत पुन्हा दहशतवादी हल्ले होण्याची भीती शुक्रवारी (3 मे) सरकारने व्यक्त केली आहे. पोलीस, लष्कर सज्ज असून नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देश्रीलंकेत आणखी दहशतवादी हल्ले होण्याची भीती शुक्रवारी सरकारने व्यक्त केली आहे. पोलीस, लष्कर सज्ज असून नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. श्रीलंकेत ज्या दहशतवादी गटाने स्फोट घटवले त्याच गटातील काही दहशतवाद्यांचा कोलंबो शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांसह महत्त्वाचे पूल पुन्हा उडवून देण्याचा कट असल्याचे सरकारने म्हटले आहे.

कोलंबो - जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना रविवारी (21 एप्रिल) श्रीलंकेमधील कोलंबो येथे चर्च आणि हॉटेलना लक्ष्य करून आठ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. कोलंबो येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 359 हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर 500 हून अधिक जण जखमी झाले. या घटनेनंतर संपूर्ण श्रीलंकेत भीतीचे वातावरण पसरले आहे. पुन्हा दहशतवादी हल्ले होण्याची भीती शुक्रवारी (3 मे) सरकारने व्यक्त केली आहे. पोलीस, लष्कर सज्ज असून नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांवरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

श्रीलंकेत ज्या दहशतवादी गटाने स्फोट घटवले त्याच गटातील काही दहशतवाद्यांचा कोलंबो शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांसह महत्त्वाचे पूल पुन्हा उडवून देण्याचा कट असल्याचे सरकारने म्हटले आहे. इसिसशी संबंधित नॅशनल तौहिद जमात या दहशतवादी गटाने श्रीलंकेत बॉम्बस्फोट उडवले होते. या पार्श्वभूमीवर पुन्हा लष्कर आणि पोलिसांनी संयुक्तपणे शोधमोहिम सुरू केल्या आहेत. या साखळी बॉम्बस्फोटांचा सूत्रधार जहरान हाश्मी याने सोशल मीडियाचा वापर केल्याचे समोर आले आहे. अनेक महिन्यांपासून सोशल मीडियाच्या चॅटरूममधून तो हल्लेखोरांना तयार करत होता. त्यासाठी त्याने फेसबुक आणि यूट्यूबचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. 

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटानंतर बुरख्यावर बंदीश्रीलंकेत बॉम्बस्फोटानंतर बुरख्यासह चेहरा झाकणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी हा निर्णय घेतला असून ट्विटरवरून याची माहिती देण्यात आली होती. श्रीलंकन सरकारने 'चेहरा झाकणाऱ्या कोणत्याही गोष्टींमुळे व्यक्तिची ओळख पटण्यास अडचणी येऊ नयेत म्हणून आपत्कालीन नियमांच्या अंतर्गत अशा गोष्टींवर प्रतिबंध केला जात आहे. राष्ट्रपतींनी त्याबाबतचा निर्णय घेतला आहे' असं ट्वीट केलं होतं. सरकारचा हा निर्णय आजपासून लागू होत आहे. फेस मास्कसह ज्या गोष्टींमुळे एखाद्या व्यक्तिची ओळख पटण्यात अडचणी येतात, अशा सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. फेस मास्क किंवा इतर साधनांनी चेहरा झाकणारी व्यक्ती राष्ट्रीय आणि पब्लिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात, असं आदेशात म्हटलं होतं. दहशतवादी हल्ल्यानंतर एका आठवड्याने हा निर्णय घेण्यात आला होता. 

मैत्रीपाला यांनी 'राष्ट्रीय सुरक्षेच्या उद्देशाने ही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कोणीही आपला चेहरा झाकता कामा नये, सुरक्षा यंत्रणांना ओळख पटविण्यात अडचणी होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी' असं आवाहन केलं आहे. तसेच श्रीलंकेतील एका खासदाराने खासगी विधेयक आणल्यानंतर हा निर्णय घ्यावा. तर सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक ठिकाणी बुरखा परिधान करून जाऊ नका, असं आवाहन ऑल सिलोन जमैयतूल उलेमा या श्रीलंकेतील मुस्लिम संघटनांनी महिलांना केलं होतं.

कोलंबोतील साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी कुख्यात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने स्वीकारली आहे. रविवारी घडवून आणलेल्या या साखळी बॉम्बस्फोटांमुळे आतापर्यंत सुमारे 359 जणांचा मृत्यू झाला असून, शेकडोजण जखमी झाले आहेत. दरम्यान, ख्राईस्टचर्च येथील मशिदीवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी श्रीलंकेमध्ये चर्च आणि हॉटेलला लक्ष्य करून हे बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आल्याचे श्रीलंकन सरकारने संसदेत सांगितले होते.  श्रीलंकेतील स्थानिक इस्लामी कट्टरवादी संघटना नॅशनल तौहीद जमात (एनटीजे) हिचा या साखळी बॉम्बस्फोटांमागे हात असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र कुठल्याही संघटनेने आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नव्हती. अखेरीस इस्लामिक स्टेटने या साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारली. इस्लामिक स्टेट या दहशतावी संघटनेने अल अमाक या यासंदर्भातील वृत्त रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिले होते. 

श्रीलंकेतील एका आत्मघातकी बॉम्बस्फोटाचा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओसमोर आला आहे. यामध्ये एक तरुण खांद्यावर बॅग घेऊन चर्च परिसरात पोहोचला होता. त्याच्या हातात स्फोट घडवण्यासाठी रिमोट होता. चर्चमध्ये पोहोचल्यानंतर काही वेळानंतर त्याने स्फोट घडवून आणला. श्रीलंकेमध्ये साखळी बॉम्बस्फोटामुळे  भीती आणि दहशतीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी देशात आणीबाणी लागू केली. जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेतील कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरले. कोलंबोमधील शँग्रिला आणि सिंनामोन ग्रँड हॉटेलमध्ये तसेच कोलंबो बंदराजवळील सेंट अँथनी चर्च, कोच्चिकेडे चर्च, उत्तलम जवळील सॅबेस्टिअन चर्च या तीन चर्चमध्ये स्फोट झाले होते. 

 

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाBlastस्फोटDeathमृत्यू