Sri Lanka Bomb Blasts : श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटानंतर बुरख्यावर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 10:17 AM2019-04-29T10:17:44+5:302019-04-29T10:29:58+5:30

श्रीलंकेत बॉम्बस्फोटानंतर बुरख्यासह चेहरा झाकणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी हा निर्णय घेतला असून ट्विटरवरून याची माहिती देण्यात आली आहे.

sri lanka bans all kind of face covering including burqa and naqab post 21 april terror blast | Sri Lanka Bomb Blasts : श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटानंतर बुरख्यावर बंदी

Sri Lanka Bomb Blasts : श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटानंतर बुरख्यावर बंदी

googlenewsNext
ठळक मुद्देश्रीलंकेत बॉम्बस्फोटानंतर बुरख्यासह चेहरा झाकणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे.श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी हा निर्णय घेतला असून ट्विटरवरून याची माहिती देण्यात आली आहे.  'चेहरा झाकणाऱ्या कोणत्याही गोष्टींमुळे व्यक्तिची ओळख पटण्यास अडचणी येऊ नयेत म्हणून आपत्कालीन नियमांच्या अंतर्गत अशा गोष्टींवर प्रतिबंध केला जात आहे. राष्ट्रपतींनी त्याबाबतचा निर्णय घेतला आहे'

कोलंबो - जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना रविवारी (21 एप्रिल) श्रीलंकेमधील कोलंबो येथे चर्च आणि हॉटेलना लक्ष्य करून आठ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. श्रीलंकेत बॉम्बस्फोटानंतर बुरख्यासह चेहरा झाकणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी हा निर्णय घेतला असून ट्विटरवरून याची माहिती देण्यात आली आहे. कोलंबो येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 359 हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर 500 हून अधिक जण जखमी झाले. या घटनेनंतर संपूर्ण श्रीलंकेत भीतीचे वातावरण पसरले आहे.

श्रीलंकन सरकारने 'चेहरा झाकणाऱ्या कोणत्याही गोष्टींमुळे व्यक्तिची ओळख पटण्यास अडचणी येऊ नयेत म्हणून आपत्कालीन नियमांच्या अंतर्गत अशा गोष्टींवर प्रतिबंध केला जात आहे. राष्ट्रपतींनी त्याबाबतचा निर्णय घेतला आहे' असं ट्वीट केलं आहे. सरकारचा हा निर्णय आजपासून लागू होत आहे. फेस मास्कसह ज्या गोष्टींमुळे एखाद्या व्यक्तिची ओळख पटण्यात अडचणी येतात, अशा सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. फेस मास्क किंवा इतर साधनांनी चेहरा झाकणारी व्यक्ती राष्ट्रीय आणि पब्लिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात, असं आदेशात म्हटलं आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर एका आठवड्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 


मैत्रीपाला यांनी 'राष्ट्रीय सुरक्षेच्या उद्देशाने ही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कोणीही आपला चेहरा झाकता कामा नये, सुरक्षा यंत्रणांना ओळख पटविण्यात अडचणी होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी' असं आवाहन केलं आहे. तसेच श्रीलंकेतील एका खासदाराने खासगी विधेयक आणल्यानंतर हा निर्णय घ्यावा. तर सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक ठिकाणी बुरखा परिधान करून जाऊ नका, असं आवाहन ऑल सिलोन जमैयतूल उलेमा या श्रीलंकेतील मुस्लिम संघटनांनी महिलांना केलं आहे. 

कोलंबोतील साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी कुख्यात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने स्वीकारली आहे. रविवारी घडवून आणलेल्या या साखळी बॉम्बस्फोटांमुळे आतापर्यंत सुमारे 359 जणांचा मृत्यू झाला असून, शेकडोजण जखमी झाले आहेत. दरम्यान, ख्राईस्टचर्च येथील मशिदीवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी श्रीलंकेमध्ये चर्च आणि हॉटेलला लक्ष्य करून हे बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आल्याचे श्रीलंकन सरकारने संसदेत सांगितले होते.  श्रीलंकेतील स्थानिक इस्लामी कट्टरवादी संघटना नॅशनल तौहीद जमात (एनटीजे) हिचा या साखळी बॉम्बस्फोटांमागे हात असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र कुठल्याही संघटनेने आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नव्हती. अखेरीस इस्लामिक स्टेटने या साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारली. इस्लामिक स्टेट या दहशतावी संघटनेने अल अमाक या यासंदर्भातील वृत्त रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिले होते. 

श्रीलंकेतील एका आत्मघातकी बॉम्बस्फोटाचा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओसमोर आला आहे. यामध्ये एक तरुण खांद्यावर बॅग घेऊन चर्च परिसरात पोहोचला होता. त्याच्या हातात स्फोट घडवण्यासाठी रिमोट होता. चर्चमध्ये पोहोचल्यानंतर काही वेळानंतर त्याने स्फोट घडवून आणला. श्रीलंकेमध्ये साखळी बॉम्बस्फोटामुळे  भीती आणि दहशतीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी देशात आणीबाणी लागू केली. जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेतील कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरले. कोलंबोमधील शँग्रिला आणि सिंनामोन ग्रँड हॉटेलमध्ये तसेच कोलंबो बंदराजवळील सेंट अँथनी चर्च, कोच्चिकेडे चर्च, उत्तलम जवळील सॅबेस्टिअन चर्च या तीन चर्चमध्ये स्फोट झाले होते. 


 

Web Title: sri lanka bans all kind of face covering including burqa and naqab post 21 april terror blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.