शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
4
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
5
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
6
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
7
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
8
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
9
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
10
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
11
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
12
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
13
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
14
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
15
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
16
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
17
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
18
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
19
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
20
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास

'आर्थिक प्रगतीसोबतच पर्यावरणाचं रक्षण करणं भारतानं जगाला शिकवलं', अमेरिकेच्या जॉन केरी यांचं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 3:40 PM

John Kerry In India: अमेरिकेचे विशेष राष्ट्रपती दूत (हवामान बदल) जॉन केरी यांनी हवामान प्रदूषण नियंत्रणासाठी भारताचं विशेष कौतुक केलं आहे.

John Kerry In India: अमेरिकेचे विशेष राष्ट्रपती दूत (हवामान बदल) जॉन केरी यांनी हवामान प्रदूषण नियंत्रणासाठी भारताचं विशेष कौतुक केलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात एक महत्त्वाकांक्षी लक्ष्य निश्चित केलं आहे. २०३० सालापर्यंत ४५० गिगावॅट अक्षय्य ऊर्जा निर्मितीचं लक्ष्य गाठणं हे जगातील सर्वात शक्तीशाली अक्षय्य ऊर्जा निमिर्तीचं लक्ष्य आहे. यात भारत आतापर्यंत जवळपास १०० गिगावॅट क्षमतेपर्यंत पोहोचला देखील आहे आणि भारताच्या अक्षय्य ऊर्जा निमिर्ती क्षेत्रातील हा एक मैलाचा दगड ठरणार आहे, असं जॉन केरी म्हणाले. (Special Presidential Envoy for Climate John Kerry praised India meeting with Minister of Power RK Singh)

जॉन केरी सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी नुकतंच केंद्रीय विद्युत आणि नाविण्य ऊर्जा मंत्री आर.के.सिंह यांच्यासोबत बैठक केली. यात हवामान बदल आणि ऊर्जा निर्मिती स्रोतांबाबत सविस्तर चर्चा झाली. आर्थिक विकास आणि स्वच्छ ऊर्जा या दोन गोष्टी सोबतच चालू शकतात. आर्थिक विकासासोबतच पर्यावरणाचं रक्षण करणं भारतानं जगाला शिकवलं आहे, असं केरी म्हणाले. भारतानं ठेवलेलं ४५० गिगावॅट अक्षय्य ऊर्जानिर्मितीचं लक्ष्य नक्की पूर्ण होईल असा विश्वास असल्याचंही ते म्हणाले. 

भारतासोबत करार करण्यास उत्सुकआर्थिक विकासात जबरदस्त कामगिरी करण्याची धमक ठेवण्यात भारत एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्तम उदाहरण आहे आणि स्वच्छ ऊर्जेला कोणताही पर्याय नाही. भारतानं या दोन्ही गोष्टींचा उत्तम मेळ साधला आहे. ग्लासगोमध्ये योग्य श्रेय दिलं जाईल अशी आशा आहे, असं केरी म्हणाले. भारत-अमेरिका यांच्यात आज क्लायमेट अॅक्शन अँड फायनान्स मोबिलायझेशन डायलॉगची घोषणा करत आहोत. भारतासोबत करारबद्ध होण्यास आम्ही उत्सुक आहोत, असंही केरी म्हणाले. 

संपूर्ण जगाला कोरोना विरोधी लसीचा पुरवठ्याकरण्यासोबतच इतर अनेक मुद्द्यांवर भारताची जागतिक पातळीवरील भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. भारतानं अनेक देशांना लस पोहोचविण्याचं काम केलं आहे. हवामानाच्या बाबतीतही भारत वेगानं काम करत आहे याबाबत मी त्यांचे विशेष आभार मानतो, असं केरी यांनी यावेळी म्हटलं आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारत