शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 14:30 IST

Spacex Base exploded during Starship Testing: या स्फोटामुळे स्पेसएक्सच्या प्रक्षेपण स्थळाचे मोठे नुकसान झाले आहे.

SpaceX Base Explosion: जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या महत्वकांशी Starship प्रोजेक्टच्या चाचणीदरम्यान SpaceX च्या संशोधन केंद्रात मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे आकाशात ज्वालामुखीसारख्या उंच ज्वाला पहायला मिळाल्या. स्टारशिप 36 च्या फायर टेस्टिंगदरम्यान हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील टेक्सास शहरात असलेल्या स्पेसएक्सच्या बेसवर हा स्फोट झाला. असे सांगितले जात आहे की, प्रक्षेपणादरम्यान रॉकेटच्या इंजिनमध्ये स्फोट झाला. स्फोटामुळे स्टारशिप प्रोटोटाइपचे मोठे नुकसान झाले. या अपगातामुळे सर्व प्रक्षेपण कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलावे लागले आहेत. दरम्यान, या स्फोटात जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. 

स्टारशिपला प्रोग्रामला मोठा धक्कास्पेसएक्स येत्या 29 जून रोजी त्यांचे पुढील स्टारशिप उड्डाण सुरू करण्याची योजना आखत होती. जगातील सर्वात शक्तिशाली आणि सर्वात मोठ्या रॉकेटची ही 10 वी चाचणी असती. पण, आता आजचा स्फोट स्पेसएक्सच्या स्टारशिप कार्यक्रमासाठी हा आणखी एक मोठा धक्का मानला जातोय. या वर्षाच्या सुरुवातीलाही स्टारशिप चाचणी उड्डाणादरम्यान रॉकेट हवेत फुटले होते. 

इलॉन मस्कची महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीमस्पेसएक्सची स्टारशिप ही इलॉन मस्कची महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम आहे. या मोहिमेद्वारे मानवांना इतर ग्रहांवर वसवण्याचे मोठे ध्येय ठेवण्यात आले आहे. या अंतर्गत चंद्रावर उतरल्यानंतर मंगळावर अंतराळयान पाठवण्याची योजना आहे. दूरच्या अंतराळ मोहिमांसाठी हे महाकाय रॉकेट खूप महत्वाचे आहे. सतत अडचणी येत असतानाही स्पेसएक्सने त्यांच्या स्टारशिप कार्यक्रमातून माघार घेतलेली नाही. 

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कAmericaअमेरिकाNASAनासाTeslaटेस्लाBlastस्फोट