कपलच्या बॅगमध्ये सापडलं सिंहाचं कापलेलं शिर, याचं काय करणार होते हे वाचून अंगावर येईल काटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 16:28 IST2021-12-24T16:27:31+5:302021-12-24T16:28:17+5:30
South Africa : एका कपलची अशीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. या कपलने मांत्रिकाच्या नादात असं काही काम केलं की, वाचून अंगावर काटा येईल.

कपलच्या बॅगमध्ये सापडलं सिंहाचं कापलेलं शिर, याचं काय करणार होते हे वाचून अंगावर येईल काटा
समाज कितीही पुढे गेला आणि लोक कितीही शिकले तरी काही लोक आजही काळी जादू,मंत्र-तंत्र यावर विश्वास ठेवतात. आश्चर्याची बाब म्हणजे अनेक उच्चशिक्षित लोकही यावर विश्वास ठेवतात. पण या गोष्टींच्या मागे लागून त्यांना नुकसानच होतं. साऊथ आफ्रिकेतील (South Africa) एका कपलची अशीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. या कपलने मांत्रिकाच्या नादात असं काही काम केलं की, वाचून अंगावर काटा येईल. या कपलच्या बॅगमध्ये पोलिसांना एका सिंहाचं कापलेलं शिर सापडलं.
सिंहाचं कापलेलं शिर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सांगितलं की, सिंहाचं कापलेलं शिर हे कपल एका तांत्रिकाला विकणार होते. याबदल्यात तांत्रिक त्यांना १८ लाख रूपये देणार होता. तांत्रिक या शिरावर काळ्या जादूचं औषध तयार करणार होता. मात्र, पोलिसांनी कपलला तांत्रिकाला भेटण्याआधीच पकडलं.
द सन च्या रिपोर्टनुसार, कपलचे हावभावावरून पोलिसांना संशय झाला होता. त्यानंतर पोलिसांनी एका खबऱ्याच्या माध्यमातून कपलसोबत मीटिंग फिक्स केली आणि कपलला पकडलं. ५९ वर्षीय पुरूष जोसफ मोडीमे आणि ५४ वर्षीय महिला एमिली मशाबा यांना पोलिसांनी अटक केली. या दोघांच्या बॅगमध्ये सिंहाचं कापलेलं शिर होतं जे ते तांत्रिकाकडे घेऊन जात होते.
पोलिसांना अजून हे समजू शकलेलं नाही की, कपलला सिंहाचं शिर कुठून मिळालं होतं. दरम्यान साऊथ आफ्रिकेत सिंहांची फार्मिंग केली जाते. इथे सिंहांना पाळलं जातं. त्यानंतर त्यांना मारून त्यांची हाडं विकली जातात. सध्या कपलला अटक करून प्रकरणाची चौकशी केली जात आहे.