Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 11:22 IST2025-06-18T11:15:32+5:302025-06-18T11:22:53+5:30
Global Air Traffic : जागतिक हवाई वाहतुकीचा एक पोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फ्लाइटराडार 24 ने शेअर केलेल्या फोटोत, जगातील बहुतेक देश विमानांनी व्यापलेले दिसत आहेत. फक्त इराण, युक्रेन आणि तिबेटमध्ये नो-फ्लाय झोन दिसत आहेत.

Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
Global Air Traffic : जगातील अनेक देशांमध्ये तणावाचे वातावरण सुरू आहे. इराण आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे मध्य पूर्व संकटाचा सामना करत आहे, तर रशिया आणि युक्रेनमधील युद्ध देखील थांबत नाहीये. दरम्यान, G-7 शिखर परिषदेमुळे कॅनडामध्ये जागतिक नेत्यांची गर्दी जमली आहे. जागतिक हवाई वाहतुकीचा एक धक्कादायक फोटो समोर आला आहे.
Flightradar24 ने सोशल मीडियावर हवाई वाहतुकीचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये, विमानांनी जगातील बहुतेक देश पूर्णपणे व्यापले आहेत, तर 2 देशांसह 3 ठिकाणी 'नो फ्लाय झोन' देखील दिसत आहे.
Flightradar24 ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर जागतिक वाहतुकीचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये लिहिले की, "सध्या जागतिक वाहतूक अशी दिसते. त्यात ३ मोठे अंतर आहेत, तिथे अजिबात हवाई वाहतूक नाही."
या ठिकाणी 'नो फ्लाय झोन'
फ्लाइटराडार 24 ने शेअर केलेल्या या फोटोत, इराण, युक्रेन आणि तिबेटवर 'नो फ्लाय झोन' दिसत आहे, त्या ठिकाणी कोणतेही विमान नाही. याशिवाय, भारत, युरोप, चीन आणि अमेरिकेचे आकाश विमानांनी भरलेले दिसत आहे. तर आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे काही भाग रिकामे दिसत आहेत.
This is what global air traffic looks like right now. Three clear gaps are limiting air traffic. pic.twitter.com/X7dV9KZv9f
— Flightradar24 (@flightradar24) June 17, 2025
इराणने एअर स्पेस बंद केला
१३ जून रोजी इस्रायलने इराणवर हवाई हल्ला केला. या दरम्यान इराणच्या अणु आणि क्षेपणास्त्र तळांना लक्ष्य करण्यात आले. इराणने आपले हवाई क्षेत्र बंद करण्याची घोषणा केली, यामुळे इराणमध्ये 'नो फ्लाय झोन' लागू आहे आणि फ्लाइटराडार24 च्या नकाशात इराणचा मोठा भाग रिकामा दिसत आहे.