शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 22:34 IST

मला खात्री आहे की, पुढील १४ दिवस अत्यंत अद्भूत असतील. कारण आपण अनेक रिसर्च करणार आहोत. जय हिंद जय भारत...

हवाई दलाचे ग्रूप कॅप्टन शुभांशू शुक्ला आणि त्यांची अ‍ॅक्सिओम-४ टीम गुरुवारी (२६ जून २०२५) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचली. २८ तासांच्या प्रवासानंतर हे सर्व जण आयएसएसमध्ये पोहोचले आहेत. सायंकाळी साधारणपणे ६ वाजण्याच्या सुमारास, अंतराळ स्थानकाचे हॅच उघडल्यानंतर, शुभांशूंसह सर्व अंतराळवीर आयएसएसमध्ये दाखल झाले. यावेळी, आयएसएसमधील टीमने त्यांचे उत्साहाने स्वागत केले.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचल्यानंतर शुभांशू शुक्ला यांनी त्यांच्या स्वागत समारंभात हिंदीतून देशवासीयांना संदेश दिला. ते म्हणाले, "तुमच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने मी अगदी सुरक्षितपणे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचलो. येथे उभे राहणे फार सोपे दिसत आहे, मात्र ते थोडे कठीण आहे. डोके काहीसे जड आहे, थोडी अस्वस्थता आहे, मात्र या फार लहान गोष्टी आहेत. काही दिवसांत याची सवय होईल. मग अशा समस्या येणार नाहीत. या प्रवासाचा हा पहिला थांबा आहे. आता पुढील १४ दिवस येथे राहून आम्ही बरेच प्रयोग करणार आहोत आणि तुमच्या सोबतही संवाद साधू."

पुढचे 14 दिवस अद्भुत असतील -हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला पुढे म्हणाले, "या ठिकाणी पोहोचण्यासाठी मी अत्यंत उत्सुक होतो. आपणही माझ्या एवढेच उत्सूक असाल. मला खात्री आहे की, पुढील १४ दिवस अत्यंत अद्भूत असतील. कारण आपण अनेक रिसर्च करणार आहोत. जय हिंद जय भारत...

एक्सिओम मिशन-4 संदर्भात नासा -नॅशनल एअरोनॉटिक्स अँड स्पेस एडमिनिस्ट्रेशनने (नासा) एका निवेदनात म्हटले आहे,  "स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयान, अ‍ॅक्सिओम मिशन-४ अंतर्गत, चौथ्या खाजगी अंतराळवीर मोहिमेसाठी गुरुवारी (२६ जून २०२५) सकाळी ६:३१ वाजता (भारतीय वेळेनुसार ४:०१ वाजता)आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले."

टॅग्स :NASAनासाisroइस्रोSpaceअंतरिक्षindian air forceभारतीय हवाई दल