"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 22:34 IST2025-06-26T22:33:16+5:302025-06-26T22:34:30+5:30

मला खात्री आहे की, पुढील १४ दिवस अत्यंत अद्भूत असतील. कारण आपण अनेक रिसर्च करणार आहोत. जय हिंद जय भारत...

Shubanshu Shukla first speech from the International Space Station, says Jai Hind, Jai Bharat | "जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?

"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?

हवाई दलाचे ग्रूप कॅप्टन शुभांशू शुक्ला आणि त्यांची अ‍ॅक्सिओम-४ टीम गुरुवारी (२६ जून २०२५) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचली. २८ तासांच्या प्रवासानंतर हे सर्व जण आयएसएसमध्ये पोहोचले आहेत. सायंकाळी साधारणपणे ६ वाजण्याच्या सुमारास, अंतराळ स्थानकाचे हॅच उघडल्यानंतर, शुभांशूंसह सर्व अंतराळवीर आयएसएसमध्ये दाखल झाले. यावेळी, आयएसएसमधील टीमने त्यांचे उत्साहाने स्वागत केले.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचल्यानंतर शुभांशू शुक्ला यांनी त्यांच्या स्वागत समारंभात हिंदीतून देशवासीयांना संदेश दिला. ते म्हणाले, "तुमच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने मी अगदी सुरक्षितपणे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचलो. येथे उभे राहणे फार सोपे दिसत आहे, मात्र ते थोडे कठीण आहे. डोके काहीसे जड आहे, थोडी अस्वस्थता आहे, मात्र या फार लहान गोष्टी आहेत. काही दिवसांत याची सवय होईल. मग अशा समस्या येणार नाहीत. या प्रवासाचा हा पहिला थांबा आहे. आता पुढील १४ दिवस येथे राहून आम्ही बरेच प्रयोग करणार आहोत आणि तुमच्या सोबतही संवाद साधू."

पुढचे 14 दिवस अद्भुत असतील -
हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला पुढे म्हणाले, "या ठिकाणी पोहोचण्यासाठी मी अत्यंत उत्सुक होतो. आपणही माझ्या एवढेच उत्सूक असाल. मला खात्री आहे की, पुढील १४ दिवस अत्यंत अद्भूत असतील. कारण आपण अनेक रिसर्च करणार आहोत. जय हिंद जय भारत...

एक्सिओम मिशन-4 संदर्भात नासा -
नॅशनल एअरोनॉटिक्स अँड स्पेस एडमिनिस्ट्रेशनने (नासा) एका निवेदनात म्हटले आहे,  "स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयान, अ‍ॅक्सिओम मिशन-४ अंतर्गत, चौथ्या खाजगी अंतराळवीर मोहिमेसाठी गुरुवारी (२६ जून २०२५) सकाळी ६:३१ वाजता (भारतीय वेळेनुसार ४:०१ वाजता)आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले."

Web Title: Shubanshu Shukla first speech from the International Space Station, says Jai Hind, Jai Bharat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.