शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

लंडनमधील शाळेत ‘शॉर्ट स्कर्ट’ला बंदी

By admin | Updated: June 17, 2015 02:28 IST

भारतीय शाळेत मुलींच्या पोशाखाबाबत अधिक सतर्कता बाळगण्यात येते. त्यावेळी परदेशात मुलींना कसे स्वातंत्र्य असते याचे दाखले देण्यात येतात

लंडन : भारतीय शाळेत मुलींच्या पोशाखाबाबत अधिक सतर्कता बाळगण्यात येते. त्यावेळी परदेशात मुलींना कसे स्वातंत्र्य असते याचे दाखले देण्यात येतात; पण आता लंडनमधील एका मुलींच्या शाळेत मुलींनी कसे पोशाख वापरावेत याचे निर्देश देण्यात आले असून, त्याअंतर्गत मुलींना शॉर्ट स्कर्ट घालण्यास बंदी करण्यात आली आहे. शॉर्ट स्कर्टऐवजी मुलींनी सूट घालावेत असे सांगण्यात आले आहे. हर्टफोर्डशेअर येथील सेंट मार्गारेट बोर्र्डिंग स्कूलमध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे. या नियमानुसार मुली शाळेत शिकण्यासाठी येतात. येथे आल्यानंतर त्यांचे लक्ष शिकण्याकडे असावे. आपण कुठले कपडे घातल्यास अधिक आकर्षक दिसतो याचा विचार करणाऱ्या मुलींचे अभ्यासात लक्ष कसे लागेल. विद्यार्थिनींनी मेकअप कमी करावा, शक्यतोवर शालिन पोशाख करावा, असे स्कूलच्या प्राचार्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांचे कपडे शालिन, त्यांचा आत्मविश्वास वाढवतील असे असावेत. मोठ्या वर्गातील विद्यार्थिनी खालच्या वर्गातील मुलींसाठी आदर्श ठराव्यात असे प्राचार्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)पालकांचा कडाडून विरोध-द टेलिग्राफने हे वृत्त दिले असून, त्यानुसार पालकांचा शाळेच्या या निर्णयाला कडाडून विरोध आहे. विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असावे, त्यावर असा जुनाट नियम लागू होता कामा नये, असे पालकांचे म्हणणे असून, एका पालकाने शाळेला पत्र लिहून आपले म्हणणे कळवले आहे. -पण शाळा आपल्या नियमावर ठाम असून, विद्यार्थ्यांनी शाळेत कोणते कपडे वापरावेत याचे नियम नसतील तर मुले फक्त त्याचाच विचार करतील, मग अभ्यासात लक्ष कसे लागणार? मग शाळेत येण्याचा उपयोग काय? असे प्राचार्यांनी विचारले आहे.