अमेरिकेतील टेक्सासमध्ये गोळीबार; 5 जणांचा मृत्यू, 21 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 08:26 IST2019-09-01T08:21:51+5:302019-09-01T08:26:51+5:30

अमेरिकेतील टेक्सासमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला असून 21 जण जखमी झाले आहेत.

Shooter killed in West Texas after 5 people died, at least 21 injured, police say | अमेरिकेतील टेक्सासमध्ये गोळीबार; 5 जणांचा मृत्यू, 21 जखमी

अमेरिकेतील टेक्सासमध्ये गोळीबार; 5 जणांचा मृत्यू, 21 जखमी

ठळक मुद्देअमेरिकेतील टेक्सासमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला असून 21 जण जखमी झाले आहेत.मिडलँडजवळ ओडेसा परिसरात ही घटना घडली.

अमेरिकेतील टेक्सासमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला असून 21 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन व्यक्तींनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. एक ट्रक हायजॅक करून गोळीबार करण्यास सुरुवात केली. 

मिडलँडजवळ ओडेसा परिसरात ही घटना घडली. यामध्ये  पाच जणांचा मृत्यू झाला असून 21 जण जखमी झाले आहेत. याआधी ऑगस्ट महिन्यात अमेरिकेतील टेक्सास आणि ओहियोमध्ये गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटनांमध्ये 29 जणांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक लोक जखमी झाले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेक्सास आणि ओहियोमधील गोळीबाराच्या घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले होते.  

 

Web Title: Shooter killed in West Texas after 5 people died, at least 21 injured, police say