थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 17:35 IST2025-12-26T17:34:31+5:302025-12-26T17:35:40+5:30
यामुळे जागतिक स्तरावर चिनी शस्त्रांस्त्रांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न निर्माण होताना दिसत आहे...

थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
चिनी शस्त्रास्त्रे काय दर्जाची आहेत, हे पुन्हा एकदा जगासमोर आले आहे. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर आता थायलंड-कंबोडिया युद्धादरम्यान चिनी रॉकेट सिस्टिमचा फायर वेळीच भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे आणि या अपघातात कंबोडियाच्या १-२ नव्हे तर तब्बल ८ सैनिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
...अन् चिनी रॉकेट सिस्टिमच्या चिंधाड्या उडाल्या -
सोशल मीडियावर थायलंड-कंबोडिया युद्धाचा एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कंबोडियन सैनिक चीननिर्मित 'मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टम' (MLRS) च्या सहाय्याने थायलंडच्या दिशेने रॉकेट डागताना दिसत आहेत. या यंत्रणेतून एकापाठोपाठ एक असे सहा रॉकेट डागले गेले आणि यानंतर, अचानक या रॉकेट सिस्टिमचाच स्फोट झाला. त्याला भीषण आग लागली आत कंबोडियाचे आठ जवानांचा मृत्यू झाला. खरे तर, चीनने ८० च्या दशकात रशियन 'BM-21 ग्रॅड'ची कॉपी करून 'PHL-81' या नावाने ही सिस्टिम तयार केली होती.
खरे तर, कंबोडियाने युद्धाच्या सुरुवातीलाच या रॉकेट सिस्टिमसंदर्भात थायलंडला धमकी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात युद्धभूमीवर ही सिस्टिम शत्रूवर तुटून पडण्याऐवजी कंबोडियाच्याच सैनिकांसाठी काळ ठरली.
ANOTHER FAILURE OF CHINESE TECH
— Frontalforce 🇮🇳 (@FrontalForce) December 25, 2025
Chinese MLRS explodes during firing in the Cambodia–Thailand war
Chinese technology 👀pic.twitter.com/nkYk823uIy
ब्रह्मोससमोर चिनी यंत्रणा अपयशी
चिनी बनावटीच्या शस्त्रास्त्रांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. तर 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान पाकिस्तानने वापरलेल्या चिनी एअर डिफेन्स सिस्टमला (HQ-9 आणि LY-80) भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा साधा सुगावाही लागला नव्हता. भारतीय क्षेपणास्त्रांना रोखणे तर दूरच, पण चिनी डिफेन्स सिस्टिम डिटेक्ट देखील करू शकले नाही. यामुळे जागतिक स्तरावर चिनी शस्त्रांस्त्रांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न निर्माण होताना दिसत आहे.