शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

Corona Virus: धक्कादायक! नव्या विषाणूंविरोधात लसी कमी प्रभावी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 4:56 AM

Corona Virus Vaccine: पाहणीतील निष्कर्ष; मूळ विषाणूवर काही प्रमाणात नियंत्रण

वॉशिंग्टन : कोरोना संसर्गावर आतापर्यंत बनविलेली औषधे व लसी या आजाराच्या नव्या प्रकारच्या विषाणूंविरोधात कमी प्रभावी ठरत आहेत, असे एका पाहणीत आढळून आले आहे. नव्या प्रकारच्या विषाणूंमुळे साथ अतिशय वेगाने पसरत आहे. मात्र सध्या उपलब्ध लसींमुळे मूळ कोरोना विषाणूवर काही प्रमाणात नियंत्रण राखता आले आहे.‘नेचर मेडिसिन’ या नियतकालिकात या पाहणीसंदर्भात एक लेख प्रसिद्ध झाला आहे. ही पाहणी वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन या संस्थेतील शास्त्रज्ञांनी केली आहे. या लेखात म्हटले आहे की, कोरोनाच्या मूळ विषाणूंविरोधात प्रभावी ठरलेल्या अँटिबॉडीज् नव्या विषाणूंवरील उपचारात काहीशा कुचकामी ठरत आहेत. 

दक्षिण आफ्रिका, ब्रिटन, ब्राझीलमध्ये आढळलेले कोरोनाचे नव्या प्रकारचे विषाणू अधिक संसर्गशक्तीचे व वेगाने साथ पसरविणारे आहेत. मूळ विषाणूंचा संसर्ग झालेल्यांना अँटिबॉडीज् तसेच लसीपासून संरक्षण मिळाले आहे. मात्र नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूंपासून संरक्षण मिळण्यासाठी सध्याच्या लसी व औषधे कमी पडत आहेत. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर व लस घेतल्यानंतर त्या रुग्णाच्या शरीरात किती अँटिबॉडीज् निर्माण होतात यावरही अनेक गोष्टी अवलंबून आहेत. नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूंना रोखण्यासाठी आणखी कोरोना लसी भविष्यात विकसित कराव्या लागतील. त्यासाठी आता जगभरातील औषध कंपन्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या