शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! चार वर्षीय मुलाला घेऊन घरी जात होती महिला, अचानक विमान कारवर येऊन आदळलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 16:46 IST

Plane crash on car in Florida : ही घटना अमेरिकेच्या फ्लोरिडातील आहे. येथील पेमब्रोक पाइन्स स्थित नॉर्थ पेरी एअरपोर्टहून या विमानाने उड्डाण घेतलं होतं.

मृत्यू कधी कुणावर कसा ओढवेल हे सांगता येत नाही. कुणाला कुठेही-कधीही मरण येऊ शकतं. याचंच उदाहरण असलेला  एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एक कार रस्त्याने जात होती आणि अचानक एक विमान कावर येऊन आदळतं (Plane crash on car Video). त्यानंतर होतो मोठा धमाका. 

ही घटना(Plane Accident) अमेरिकेच्या फ्लोरिडातील (Florida) आहे. येथील पेमब्रोक पाइन्स स्थित नॉर्थ पेरी एअरपोर्टहून या विमानाने उड्डाण घेतलं होतं. काही वेळानेच हे विमान रहिवाशी भागातील एका रस्त्यावर येऊन कोसळतं (Plane Crash). थेट एका कारवर येऊन पडतं.

मुलाला घेऊन जात होती महिला

जेव्हा हे विमान पडलं तेव्हा एक महिला कारने आपल्या चार वर्षीय मुलाला घरी घेऊन जात होती. हे विमान नेमकं या कारवरंच येऊन आदळलं. विमान जमिनीवर आदळलं आणि नंतर त्याने पेट घेतला. इंडिया टाइम्सच्या रिपोर्टनुसार या कारमध्ये जो चार वर्षांचा मुलगा होता त्याला आणि त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र, मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

NBC नुसार, विमान असलेल्या पायलटचा आणि एका प्रवाशाचाही या अपघातात मृत्यू झाला. या अपघातून कारमधील महिला वाचली आहे. सध्या ती हॉस्पिटलमध्ये असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही महिला शिक्षिका आहे. 

महिलेच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, 'ही घटना हृदय पिळवटून टाकणारा आहे. तुम्ही तुमचा दिवस संपवून आपल्या मुलासोबत जात असता आणि रस्त्यात ही घटना घडते'. सध्या या घटनेचा तपास सुरू आहे. विमान खाली कसं पडलं हे अजून समजलं नाही. 

टॅग्स :AmericaअमेरिकाairplaneविमानAccidentअपघात