युक्रेनमध्ये खळबळ! रशियाविरुद्ध युद्ध सुरू असतानाच माजी ऊर्जा मंत्री देशाबाहेर पळण्याच्या प्रयत्नात; सीमेवरून घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 11:32 IST2026-02-16T11:31:07+5:302026-02-16T11:32:56+5:30

Ukraine Energy Scandal : युक्रेनमध्ये रशिया-युक्रेन युद्धादरम्यान भ्रष्टाचाराचे मोठे प्रकरण समोर आले आहे. माजी ऊर्जा मंत्री जर्मन गालुशचेंको यांना देश सोडून पळून जाताना अटक करण्यात आली. वाचा सविस्तर बातमी.

Shocking in Ukraine! zelensky's Former energy minister German Galushchenko tries to flee the country while war against Russia is ongoing; detained at the border | युक्रेनमध्ये खळबळ! रशियाविरुद्ध युद्ध सुरू असतानाच माजी ऊर्जा मंत्री देशाबाहेर पळण्याच्या प्रयत्नात; सीमेवरून घेतले ताब्यात

युक्रेनमध्ये खळबळ! रशियाविरुद्ध युद्ध सुरू असतानाच माजी ऊर्जा मंत्री देशाबाहेर पळण्याच्या प्रयत्नात; सीमेवरून घेतले ताब्यात

कीव: एकीकडे रशियासोबतच्या भीषण युद्धात युक्रेनचे ऊर्जा क्षेत्र रशियाच्या हल्ल्यांमुळे उद्ध्वस्त होत असतानाच, दुसरीकडे देशात भ्रष्टाचाराच्या एका मोठ्या प्रकरणाने राजकीय भूकंप घडवून आणला आहे. युक्रेनचे माजी ऊर्जा मंत्री जर्मन गालुशचेंको यांना देश सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात सीमेवर अटक करण्यात आली आहे.

युक्रेनच्या भ्रष्टाचार विरोधी ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, गालुशचेंको यांच्यावर ऊर्जा क्षेत्रातील तब्बल १०० दशलक्ष डॉलरच्या संशयास्पद व्यवहारांचा आरोप आहे. विशेषतः अणू ऊर्जा प्रकल्पांशी संबंधित सरकारी कंत्राटांमध्ये मोठ्या प्रमाणात कमिशन आणि लाच घेतल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. गालुशचेंको यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

कशी होती घोटाळ्याची कार्यपद्धती?
तपासात असे समोर आले आहे की, वरिष्ठ अधिकारी आणि मध्यस्थांनी संगनमताने सरकारी ऊर्जा प्रकल्पांचे कंत्राट वाढीव दराने दिले. कंत्राटदारांना १० ते १५ टक्के लाच देण्यासाठी भाग पाडले जात होते. या भ्रष्टाचारातून मिळालेला पैसा मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून परदेशात पाठवण्यात आल्याचेही उघड झाले आहे. या प्रकरणात व्यावसायिक तैमूर मिंडिच याचेही नाव समोर आले असून, त्याने या संपूर्ण कटाचा आराखडा तयार केल्याचा आरोप आहे.

राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावर दबाव वाढला
युक्रेन युद्धामुळे आधीच आर्थिक आणि सामाजिक संकटात असताना, सरकारी मंत्र्यांनी केलेला हा भ्रष्टाचार जनतेत संताप निर्माण करत आहे. यापूर्वी माजी उपपंतप्रधान ओलेक्सी चेर्निशोव यांनाही अशाच प्रकरणात अटक करण्यात आली होती. युद्धाच्या काळात ऊर्जा क्षेत्र हा देशाचा कणा आहे, मात्र याच क्षेत्रात झालेल्या घोटाळ्यामुळे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्या प्रशासनावर अतिरिक्त दबाव निर्माण झाला आहे.

Web Title : यूक्रेन: रूस युद्ध के बीच पूर्व ऊर्जा मंत्री भ्रष्टाचार के आरोप में गिरफ्तार

Web Summary : यूक्रेन के पूर्व ऊर्जा मंत्री युद्ध के बीच भागते हुए गिरफ्तार, ऊर्जा क्षेत्र में 100 मिलियन डॉलर के भ्रष्टाचार का आरोप। सरकारी अनुबंधों से जुड़े घूस और मनी लॉन्ड्रिंग का खुलासा, राष्ट्रपति जेलेंस्की पर दबाव बढ़ा।

Web Title : Ukraine: Ex-Energy Minister Arrested Fleeing Amidst Russia War Graft Scandal

Web Summary : Former Ukrainian Energy Minister arrested fleeing amid war, facing corruption charges involving $100M in energy sector deals. Investigations reveal bribery and money laundering linked to government contracts, intensifying pressure on President Zelensky.