Ice cream Corona: खळबळ उडाली! आईस्क्रीम कोरोना पॉझिटिव्ह; अख्खी कंपनीच क्वारंटाईन केली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 08:30 AM2021-01-17T08:30:11+5:302021-01-17T08:30:45+5:30

Corona Virus News: यूनिव्हर्सिटी ऑफ लीड्सचे व्हायरॉलॉजिस्ट डॉ. स्टीफेन ग्रिफिन यांनी सांगितले की, आईस्क्रीममध्ये कोरोना सापडणे म्हणजे कोणत्यातही माणसाकडून ते त्यामध्ये गेले असावेत. कंपनीद्वारेच असे होण्याची शक्यता आहे.

Shocking! Ice cream corona positive; entire company was quarantined | Ice cream Corona: खळबळ उडाली! आईस्क्रीम कोरोना पॉझिटिव्ह; अख्खी कंपनीच क्वारंटाईन केली

Ice cream Corona: खळबळ उडाली! आईस्क्रीम कोरोना पॉझिटिव्ह; अख्खी कंपनीच क्वारंटाईन केली

Next

बिजिंग : एकीकडे कोरोनाच्या सुपरफास्ट स्ट्रेनने जगभरात पुन्हा दहशत पसरविली असताना आता आईस्क्रीममध्येही कोरोना सापडल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे कोरोनाच्या जन्मदात्या चीनमध्ये आईस्क्रीम कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहे. यामुळे आता चीनचा आरोग्य विभाग हे आईस्क्रीम खाणाऱ्या लोकांच्या शोधासाठी जंग जंग पछाडू लागले आहे. 


हे आईस्क्रीम खाल्याने अनेकांना कोरोनाचे संक्रमण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. चीनच्या पूर्वेकडील तियानजिन भागात हे आईस्क्रीम विकले गेले. या भागातील स्थानिक कंपनीने हे आईस्क्रीम बनविले. याच्या तपासणीसाठी तीन नमुने घेण्यात आले. हे सर्व कोरोना पॉझिटिव्ह निघाले. 


चायना डेलीच्या वृत्तानुसार Tianjin Daqiaodao फूड कंपनीला 4,836 बॉक्स कोरोनाने संक्रमित असल्याची माहिती मिळाली. यापैकी 2,089 स्टोरेजमध्येच होते. तर 1812 बॉक्स दुसऱ्या राज्यांमध्ये पाठविण्यात आले होते. तसेच 935 आईस्क्रीम पॅकेट स्थानिक बाजारातही पाठविण्यात आले होते. यापैकी 65 आईस्क्रीम पॅकेटच विकले गेले होते. कोरोनाचे संक्रमण झाल्याचे समजताच कंपनीने 1662 कर्मचाऱ्यांना सेल्फ आयसोलेशनमध्ये पाठविले आहे. तसेच त्यांच्या चाचण्याही घेण्यात येत आहेत. 


याशिवाय जे लोक या आईस्क्रीम पॅकेटच्या संपर्कात आले त्यांचीही माहिती घेतली जात आहे. ते कोणाकोणाच्या संपर्कात आले, दुकानदार कोण होते, त्यांचे कर्मचारी आदींची माहिती घेतली जात आहे. 


यूनिव्हर्सिटी ऑफ लीड्सचे व्हायरॉलॉजिस्ट डॉ. स्टीफेन ग्रिफिन यांनी सांगितले की, आईस्क्रीममध्ये कोरोना सापडणे म्हणजे कोणत्यातही माणसाकडून ते त्यामध्ये गेले असावेत. कंपनीद्वारेच असे होण्याची शक्यता आहे. कारण हायजिनची काळजी घेतली गेली नसेल. आईस्क्रीम थंड असल्याने त्यामध्ये कोरोना व्हायरस जिवंत राहतो. मात्र, आईस्क्रीम बनविणाऱ्या कंपन्यांनी काळजी घेतली तर असे प्रकार पुढे होणार नाहीत. 

Web Title: Shocking! Ice cream corona positive; entire company was quarantined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.