शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक, सलून वर्करमुळे 91 लोकांना झाला संसर्ग, लॉकडाऊन हटवणे पडले महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 16:27 IST

येथे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य आहे. अमेरिकेने मार्चपासून लाॅकडाऊनचे कडक पालन करण्यास सुरुवात केली हाेती.

अमेरिकेत ३० राज्यांत लाॅकडाऊनमध्ये शिथिलता  देण्यात आली आहे. ११ राज्यांच्या काही भागांत लाॅकडाऊनमध्ये सवलत दिली. ४ राज्ये पुढील आठवड्यात लाॅकडाऊनमध्ये सवलत देतील. पाच राज्यांत मात्र अजूनही कडक लाॅकडाऊन लागू राहणार आहे. अमेरिकेत लाॅकडाऊनमधील सवलती अंतर्गत किनारपट्या, जिम, रिटेल दुकाने, रेस्तराँ, बार, सलून, थिएटर, उद्याेग, कार्यालये, धार्मिक स्थळ सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. येथे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य आहे. अमेरिकेने मार्चपासून लाॅकडाऊनचे कडक पालन करण्यास सुरुवात केली हाेती. 

अमेरिकेत लॉकडाऊन उठवण्यात आल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची जोखीम वाढली आहे. मिसोरीमध्ये बाधित सलून वर्करमुळे ९१ जणांना बाधा झाली. त्यात ८४ ग्राहक, ७ सहकाऱ्यांचा समावेश आहे. लॉकडाऊन उठवण्यात आल्यानंतर प्रादुर्भाव झालेला कामगार आठ दिवस कामावर आला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.मिसोरीमध्ये ४ मेपासून सलून सुरू झाले होते. कोराेना संसर्गाचे येथे ११ हजार ७५२ रुग्ण असून ६७६ जणांचा त्यात मृत्यू झाला.

अमेरिकेत दोन आठवडे आधी लॉकडाऊन लागू केला असता तर कोरोना विषाणू संसर्गामुळे ८३ टक्के प्राण वाचवता येऊ शकले असते. कोलंबिया विद्यापीठातील एका अभ्यासाद्वारे हा दावा करण्यात आला आहे. संशोधकांनी ३ मेपर्यंत आकड्यांचा अभ्यास केला. त्यानुसार सरकारने १ मार्चपूर्वी लॉकडाऊन लागू केला असता तर ११ हजार २५३ जणांचा मृत्यू झाला असता असे सर्व्हेक्षणारून सांगितले जात आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या