Shivon zilis: एलन मस्कसोबत नेहमी दिसणारी ही महिला कोण आहे?, भारताशी आहे खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 20:44 IST2025-01-22T20:42:15+5:302025-01-22T20:44:27+5:30

Who is Shivon Zilis: डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात आणि त्यानंतर एक महिला सतत एलन मस्क यांच्यासोबत दिसली. ती कोण आहे?

Shivon zilis: Who is this woman who is always seen with Elon Musk? | Shivon zilis: एलन मस्कसोबत नेहमी दिसणारी ही महिला कोण आहे?, भारताशी आहे खास कनेक्शन

Shivon zilis: एलन मस्कसोबत नेहमी दिसणारी ही महिला कोण आहे?, भारताशी आहे खास कनेक्शन

Shivon Zilis Elon Musk: डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एलन मस्क यांच्यासोबत एक महिला दिसली. ही महिला सातत्याने मस्क यांच्यासोबत वावरत असल्यानंतर तिची चर्चा सुरू झाली. या महिलेचे नाव आहे शिवोन जिलिस!

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

एलन मस्क जेफ बेजोस आणि त्यांच्या पत्नी लॉरेन सांचेज, इवान्का ट्रम्प आणि जेरेड कुश्नर यांना भेटले. त्यावेळी शिवोन जिलिस या त्यांच्यासोबतच होत्या. त्यामुळेच त्यांचे नाव जास्त चर्चेत आले. 

कोण आहेत शिवोन जिलिस?

३८ वर्षीय शिवोन जिलिस या कॅनडातील ओटारियाच्या रहिवासी आहेत आणि येल विद्यापीठाच्या पदवीधारक आहेत. त्यांची आई पंजाबी होती, तर वडील कॅनडाचे नागरिक. शिवोन जिलिस या एलन मस्क यांच्या न्युरालिंक कंपनीत संचालक म्हणून कार्यरत आहेत. ओपन एआयच्या सल्लागारही त्या आहेत.

एलन मस्क यांच्यासोबत शिवोन जिलिस यांचं नात काय?

शिवोन जिलिस आणि एलन मस्क यांचं नात खूप खासगी राहिलेलं आहे. २०२१ मध्ये दोघांना जुळी मुले झाली. २०२४ मध्ये दोघांना तिसरे मुल झाले. 


 
शिवोन जिलिस आणि एलन मस्क पहिल्यांदाच एका मोठ्या कार्यक्रमात एकत्र दिसले. एलन मस्क यांना पहिली पत्नी जस्टिन विल्सन यांच्यापासून पाच मुले आहेत. त्यानंतर एलन मस्क आणि गायिका ग्राइम्स यांना तीन मुले झाली. सध्या त्यांचा ताबा मिळवण्यासाठी दोघांमध्ये कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. 

Web Title: Shivon zilis: Who is this woman who is always seen with Elon Musk?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.