त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 07:44 IST2025-07-20T07:44:38+5:302025-07-20T07:44:54+5:30
चंद्रशेखर बर्वे नवी दिल्ली : आशियातील देशांतील महिला खासदारांना लैंगिक छळ आणि हिंसेचा सामना करावा लागत असल्याची माहिती एका ...

त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
चंद्रशेखर बर्वे
नवी दिल्ली : आशियातील देशांतील महिलाखासदारांना लैंगिक छळ आणि हिंसेचा सामना करावा लागत असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून पुढे आली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियासह ३३ देशांमधील तब्बल २५ टक्के महिलाखासदार आणि संसदेतील ३६ टक्के महिला कर्मचाऱ्यांना हा त्रास सहन करावा लागतो, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
भारताची सकारात्मक पाऊले
महिला खासदार व कर्मचाऱ्यांवरील अत्याचार थांबविण्यास ऑस्ट्रेलिया, फिजी, भारत, मालदीव, कोरिया प्रजासत्ताक, श्रीलंका, फिलिपिन्स, न्यूझीलंड व थायलंड आदी देशांतील संसदेने पावले उचलली.
महिलांची या छळातून सुटका कधी?
प्रकार खासदार कर्मचारी
मानसिक छळ ७६ % ६३ %
लैंगिक हिंसा २५ % ३६ %
आर्थिक २४ % २७ %
शारीरिक हिंसा १३ % ५ %
हाही ताप झाला!
महिला खासदारांना बदनामी करणे, चुकीची माहिती पसरविणे, प्रतिमा मलिन करणे आणि खासगी माहिती इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देण्यासारख्या प्रकाराचा सामना करावा लागला.
कुणाचे प्रमाण जास्त ?
इंटर पार्लिमेंटरी युनियनने कॉमनवेल्थ पार्लिमेंटरी असोसिएशन व आशियान इंटर पार्लिमेंटरी असेंब्लीच्या साहाय्याने हे सर्वेक्षण केले. ‘सेक्सिज्म, हरॅसमेंट ॲण्ड व्हॉयलेंस अगेंस्ट वुमन इन पार्लिमेंट इन द एशिया-पॅसिफिक रिजन’ या अहवालासाठी १५० खासदारांशी चर्चा केली. वय ४० वर्षांपेक्षा कमी, अल्पसंख्यांक समुदायातील व अविवाहित महिला खासदारांचा छळ होण्याचे प्रमाण जास्त आहे.