शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शहबाज-मुनीर अमेरिकेची नुसती 'लाळ' घोटत बसले; ट्रम्प यांनी मोठा दणका दिला; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 17:36 IST

...गेल्या काही महिन्यांपासून ट्रम्प यांच्याशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला हा एक मोठा दणका मानला जात आहे.

अमेरिकेने पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानसंदर्भात आपल्या नागरिकांसाठी अत्यंत कडक सूचना जारी केल्या आहेत. ट्रम्प प्रशासनाने नवीन 'ट्रॅव्हल ॲडव्हायजरी' जारी करत अमेरिकन नागरिकांना पाकिस्तानात जाण्यापूर्वी दोन वेळा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ट्रम्प यांच्याशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला हा एक मोठा दणका मानला जात आहे.

पाकिस्तानला धक्का -गेल्या काही घडामोडी बघता, आपण ट्रम्प यांच्या जवळचे आहोत, अशी पाकिस्तानची धारणा झाली होती. पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी ट्रम्प सत्तेत आल्यापासून दोन वेळा अमेरिका दौरा केला. तर पंतप्रधान शहबाज शरीफही आंतरराष्ट्रीय पातळीवर ट्रम्प यांच्या सुरात सूर मिसळताना दिसतात. एवढेच नाही तर, गाझा शांततेसाठी बनवलेल्या ट्रम्प यांच्या 'बोर्ड ऑफ पीस'मध्येही पाकिस्तानने सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, असे सर्व असतानाही अमेरिकेने पाकिस्तानला असुरक्षित देशांच्या 'लेव्हल ३' श्रेणीत ठेवले आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने २६ जानेवारी रोजी ही ॲडव्हायजरी अद्ययावत केली. पाकिस्तानमध्ये कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय दहशतवादी हल्ले होऊ शकतात, त्यामुळे तो उच्च जोखमीचा देश असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. बस स्थानके, हॉटेल, बाजारपेठा, लष्करी तळ, विमानतळ, शाळा, रुग्णालये आणि धार्मिक स्थळांजवळ सर्वाधिक धोका असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. विशेषतः खैबर पख्तूनख्वा भागाला 'लेव्हल ४' श्रेणीत ठेवण्यात आले असून, तिथे हत्या आणि अपहरणाच्या घटनांमुळे जाण्यास पूर्णतः मनाई करण्यात आली आहे.

भारत कोणत्या श्रेणीत? -दुसरीकडे, अमेरिकेने भारताला 'लेव्हल २' श्रेणीत ठेवले असून, तिथे केवळ सतर्क राहून प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे. केवळ पाकिस्तान सीमेजवळील भागातत खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तान