"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 22:07 IST2025-09-26T22:06:40+5:302025-09-26T22:07:54+5:30
महत्वाचे म्हणजे, भारताच्या ताकदीसमोर नतमस्तक होऊन पाकिस्तानला युद्धबंदीसाठी, भारतासमोर गुडघ्यावर येऊन रडारड करावी लागली होती.

"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) 80व्या सत्रात पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा खोटे दावे केले आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तानची अनेक लढाऊ विमानं पाडली होती. मात्र, UNGA च्या मंचावरून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी खोटे पसरवत, पाकिस्तानी पायलट्सनीत भारताची सात विमाने पाडल्याचा दावा केला. खरे तर, मे 2025 मध्ये झालेल्या या संघर्षात भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने आणि एक मोठे विमान पाडले होते. महत्वाचे म्हणजे, भारताच्या ताकदीसमोर नतमस्तक होऊन पाकिस्तानला युद्धबंदीसाठी, भारतासमोर गुडघ्यावर येऊन रडारड करावी लागली होती.
पाकिस्तान कुठलाही पुरावा दाखवू शकलेला नाही -
शरीफ यांनी दावा केला की, मे महिन्यात पाकिस्तानला पूर्वेकडून झालेल्या हल्ल्यांचा सामना करावा लागला. आम्ही “स्वसंरक्षणासाठी” भारताला प्रत्युत्तर दिले. खरे तर, ‘ऑपरेशन सिंदूर’ हे 7 मे 2025 रोजी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला भारताचे प्रत्युत्तर होते. पहलगाममध्ये TRF या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने 26 निष्पाप भारतीयांचा बळी घेतला होता. भारतीय हवाई दलाचे प्रमुख अमर प्रीत सिंह यांनी गेल्या महिन्यात स्पष्ट केले होते की, भारताने या कारवाईत पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने आणि एक मोठे विमान पाडले होते. या ऊलट, शरीफ करत असलेल्या दाव्यांच्या समर्थनार्थ पाकिस्तान कुठलाही पुरावा दाखवू शकलेला नाही.
शरीफ यांनी शांततेची भाषा बोलत, भारताशी सर्वसमावेशक चर्चेची तयारी दर्शवली आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या शांतता प्रयत्नांचे कौतुक करत, त्यांना पाकिस्तानने नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित केल्याचे सांगितले.