दुबई : इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल जहाजांना लक्ष्य करून इंधन पुरवठा थांबवला असल्याने अमेरिकेने 'जी-७' देशांना साकडे घातले आहे. होर्मुझमधून तेल जहाजांना सुरक्षित मार्ग मिळावा म्हणून 'जी-७' गटाच्या देशांनी युद्धनौका पाठवाव्यात असे आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. पण या आवाहनाला जी -७ देशांना भरीव असा प्रतिसाद दिला नाही.
अमेरिकेच्या या आवाहनावर चीनने आखातातील युद्ध प्रथम थांबवावे व चर्चा करावी अशी भूमिका घेतली आहे. या घडामोडीत हॉर्मुझ बंदरातून आपल्या मित्र राष्ट्रांच्या माल वाहतूक जहाजांना अडवले जात नाही पण अमेरिकेला मदत करणाऱ्या देशांची जहाजे आम्ही अडवत असल्याचे इराणने म्हटले आहे. इराणकडून काही व्यापारी जहाजांवर हल्ले झाल्याने होर्मुझमधील जहाजवाहतूक जवळपास ठप्प झाली आहे.
कोणता देश काय म्हणाला - चीनया प्रदेशातील लष्करी हल्ले तत्काळ थांबवावेत. होर्मुझमधील तणावाने क्षेत्रिय शांतता व जागतिक स्थैर्यावर परिणाम झाला आहे. ऊर्जासंकटही निर्माण झाले आहे. तणाव वाढवू नका.
ब्रिटनआम्ही होर्मुझचा मार्ग पुन्हा खुला करण्यासाठी सहयोगी देशांशी चर्चा करून योजना आखत आहोत. मात्र, ही योजना ‘नाटो’चा भागही असणार नाही. युद्धात थेट सहभागी होणार नाही.
जर्मनीहे आमचे युद्ध नाही आणि आम्ही ते सुरू केलेलेही नाही. अमेरिका-इस्रायलने आपली लष्करी उद्दिष्टे स्पष्ट करावीत. परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत आमचे सैन्य आखातात पाठवणार नाही.
फ्रान्सतेथील परिस्थिती शांत झाल्यावर व्यापारी जहाजांना सुरक्षा देण्याचा आम्ही विचार करू. युरोप, भारत व आशियातील अन्य देशांशी आमची चर्चा सुरू आहे. त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ.
जपानहोर्मुज सामुद्रधुनीतील सध्याची परिस्थिती पाहता तेथे सुरक्षा मोहीम सुरू करण्याचा आमचा विचार नाही. आमचे तेथील परिस्थितीवर लक्ष आहे. मित्रदेशांशी संवाद सुरू आहे.
कॅनडाहोर्मुझच्या सामुद्रधुनीचा मार्ग जागतिक व्यापारासाठी खुला ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रश्न कमी होतील. पण या प्रदेशात सध्या आमच्या युद्धनौका पाठवल्या जाणार नाहीत.
इटली युरोपीय देशांशी आमची सद्यपरिस्थितीवर चर्चा सुरू आहे. आंतरराष्ट्रीय मोहिमेत रस असला तरी अंतिम निर्णय परिस्थिती आणि सामूहिक सहमतीवर अवलंबून असेल.
Web Summary : America urged G7 to send warships to secure Hormuz Strait oil tankers. G7 nations declined, prioritizing de-escalation. China seeks talks; Iran targets pro-US ships, disrupting trade.
Web Summary : अमेरिका ने जी7 से होरमुज़ जलडमरूमध्य तेल टैंकरों को सुरक्षित करने के लिए युद्धपोत भेजने का आग्रह किया। जी7 राष्ट्रों ने अस्वीकार कर दिया, डी-एस्केलेशन को प्राथमिकता दी। चीन वार्ता चाहता है; ईरान समर्थक अमेरिकी जहाजों को निशाना बनाता है, जिससे व्यापार बाधित होता है।