शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 18:19 IST2025-11-17T18:16:33+5:302025-11-17T18:19:47+5:30
Sheikh Hasina Bangladesh : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Sheikh Hasina Bangladesh : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने हिंसाचाराबद्दल दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे. हसीना यांनी गेल्यावर्षी झालेल्या हिंसाचारानंतर भारतात आश्रय घेतला होता, तेव्हापासून ते इथेच राहत आहेत. आता बांगलादेशच्या अंतरिम सरकारने एक निवेदन जारी करुन हसीना यांना परत पाठवण्याची विनंती केली आहे.
बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले की, आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT) जुलैमध्ये झालेल्या हिंसाचार आणि हत्याकांडासाठी जी पंतप्रधान शेख हसीना आणि माजी गृहमंत्री असदुज्ज्मान खान कमाल दोघांनाही मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले आहे आणि मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. कोणत्याही देशाने त्यांना आश्रय देणे म्हणजे हे न्यायाची थट्टा आणि अत्यंत शत्रुत्वाचे कृत्य असेल.
युनूस सरकारने भारतासोबत 2013 च्या प्रत्यार्पण कराराचाही हवाला दिला आणि भारत सरकार प्रत्यार्पणासाठी बांधील असल्याचे म्हटले. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने शेख हसीना आणि कमाल यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर काही तासांतच ही मागणी करण्यात आली आहे.
भारताची प्रतिक्रिया
Our statement regarding the recent verdict in Bangladesh⬇️
— Randhir Jaiswal (@MEAIndia) November 17, 2025
🔗 https://t.co/jAgre4dNMnpic.twitter.com/xSnshW6AzZ
या संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया देताना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याबाबत जाहीर केलेल्या निकालाची भारताने दखल घेतली आहे. जवळचा शेजारी म्हणून, भारत बांगलादेशच्या लोकांच्या सर्वोत्तम हितासाठी वचनबद्ध आहे, ज्यामध्ये त्या देशातील शांतता, लोकशाही, समावेशकता आणि स्थिरता यांचा समावेश आहे. त्यासाठी आम्ही नेहमीच सर्वांशी रचनात्मकपणे संवाद साधू.