शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

ओबामांच्या प्रयत्नांत सिनेटचा खोडा

By admin | Updated: December 3, 2015 03:18 IST

हवामान बदलास कारणीभूत ठरणाऱ्या कार्बन उत्सर्जनास आळा घालण्यासाठी ओबामा प्रशासनाने तयार केलेली नवी नियमावली अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधी सभेने फेटाळली आहे.

ली बुर्गेत (पॅरिस) : हवामान बदलास कारणीभूत ठरणाऱ्या कार्बन उत्सर्जनास आळा घालण्यासाठी ओबामा प्रशासनाने तयार केलेली नवी नियमावली अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधी सभेने फेटाळली आहे. ओबामांना नकाराधिकार (व्हेटो) वापरून ही नियमावली लागू करावी लागेल, अशी चिन्हे आहेत. रिपब्लिकन्स सदस्यांनी मंगळवारी ओबामांच्या या नियमांच्या विरोधात मत दिले. ओबामांच्या नियमांना नामंजूर करणारे ठराव रिपब्लिकनांचे नियंत्रण असलेल्या सिनेटने मंजूर केले असले तरी ते मुळात सांकेतिक आहेत, तरीही ओबामा प्रशासनाची त्याने खरडपट्टी काढली आहे. ओबामा या ठरावांवर आपला नकाराधिकार वापरतील व या नकाराधिकाराला डावलण्यासाठी काँग्रेसकडे पुरेशी मते नाहीत, असे व्हाईट हाऊसने म्हटले. हवामान बदल परिषदेत ओबामा यांच्या या भूमिकेला कोळसा, तेल आणि गॅस जाळून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाला कमी करण्यासाठी करार व्हावा अशी इच्छा असलेल्या देशांचा पाठिंबा मिळाला. काँग्रेसची मंजुरी नसतानाही ओबामांनी हा करार लागू करण्याचा प्रयत्न केल्यास रिपब्लिकन सदस्यांचा विरोध प्रखर होऊ शकतो. अमेरिकन प्रशासनाने २०२५ पर्यंत कार्बन उत्सर्जन २८ टक्क्यांनी घटविण्याचा संकल्प आंतरराष्ट्रीय परिषदांदरम्यान केला आहे; परंतु पॅरिस करारातील उत्सर्जनाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी ओबामांना हा प्रस्ताव काँग्रेसमध्ये मांडावा लागेल व तेथे त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता नाही. रिपब्लिकनच्या अनेक नेत्यांनी तापमानाच्या वस्तुस्थितीबद्दल संशय व्यक्त केला आहे व त्यांना कठोर प्रदूषण नियमांमुळे नोकऱ्यांची संख्या कमी होण्याची भीती वाटते. प्रशासन लक्ष्य गाठण्यासाठी देशांनी कधी आणि वेळोवेळी कसा आपल्या लक्ष्याचा आढावा घेतला पाहिजे,अशी भूमिका घेऊन कठोर नियमांच्या बाहेर यायच्या प्रयत्नांत आहे. (वृत्तसंस्था)