वैज्ञानिकांची कमाल! १९८८ मध्ये मृत प्राण्याला क्लोनिंगने केलं जिवंत...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 07:07 PM2021-09-06T19:07:14+5:302021-09-06T19:14:18+5:30

एखाद्या लुप्त झालेल्या प्रजातीला क्लोनिंगच्या माध्यमातून वाचवण्याची अमेरिकेतील वैज्ञानिकांचा हा पहिलाच प्रयत्न होता. जगभरातील वेगवेगळ्या देशांनी असा प्रयत्न आधीच केला आहे.

Scientists bring back to life extinct ferret species using cloning method | वैज्ञानिकांची कमाल! १९८८ मध्ये मृत प्राण्याला क्लोनिंगने केलं जिवंत...

वैज्ञानिकांची कमाल! १९८८ मध्ये मृत प्राण्याला क्लोनिंगने केलं जिवंत...

googlenewsNext

जे मृत झाले आहेत त्यांना जिवंत करणं अशक्य आहे? आपण हेच ऐकतो. पण आता ही धारणा खोटी सिद्ध झाली आहे. अमेरिकेतील काही वैज्ञानिकांनी एका लुप्त प्राण्याला जिवंत करून हे सिद्ध केलं आहे.

रिपोर्ट्सनुसार, Black-Footed Ferret नावाचा एक प्राणी लुप्त झाला होता. US Fish and Wildlife Service, ViaGen,Revive & Restore, Pets & Equine, the Association of Zoos and Aquariums and San Diego Zoo Global च्या वैज्ञानिकांनी मिळून क्लोनिंग प्रकियेने लुप्त झालेल्या प्राण्याला जिवंत केलं.

एखाद्या लुप्त झालेल्या प्रजातीला क्लोनिंगच्या माध्यमातून वाचवण्याची अमेरिकेतील वैज्ञानिकांचा हा पहिलाच प्रयत्न होता. जगभरातील वेगवेगळ्या देशांनी असा प्रयत्न आधीच केला आहे. उत्तर अमेरिकेत Ferret ची एकमेव प्रजाती Black-Footed १९८० च्या दशकात लुप्त झाली होती. जसजसा मनुष्यांनी शेती करण्याचं क्षेत्र वाढवलं तसतशी या प्राण्यांची संख्या घटत गेली होती.

१९८१ मध्ये एका शेतकऱ्याला आपल्या शेतात Black Footed Ferrets दिसले. पर्यावरणवाद्यांनी त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं आणि ब्रीडिंग केली. यातील केवळ ७ फेरेटच प्रजनन करू शकले. आज या प्रजातीचे केवळ ६५० सदस्य जिवंत आहेत. जे दोन वेगवेगळ्या स्थानांवर सुरक्षित आहेत.

नुकताच वैज्ञानिकांना Black-Footed Ferret चा फ्रोजन टिश्यू मिळाला आणि त्यापासून एक क्लोन तयार करण्यात आला. त्याचं नाव  Elizabeth Ann. असं ठेवण्यात आलं. Dolly या शेळीला जिवंत करण्यासाठी जी प्रक्रिया १९९६ मध्ये वापरली, तिच प्रक्रिया  Ferret ला जिवंत करण्यासाठी वापरली. २०१३ मध्येच हा क्लोनिंग प्रोजेक्ट सुरू झाला होता आणि डिसेंबर २००२० मध्ये क्लोन्ड Ferret Elizabeth Ann जन्माला आलं. 
 

Web Title: Scientists bring back to life extinct ferret species using cloning method

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.