कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 17:43 IST2026-04-06T17:41:47+5:302026-04-06T17:43:51+5:30

सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा फटका भारतासह इतर आशियाई देशांना बसणार आहे.

Saudi Aramco will increase flagship Arab Light crude prices for May sales for Asia, Tension for India | कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?

कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?

अमेरिका इराण यांच्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. जागतिक बाजारपेठेत तेलाचे दर १२० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहचलेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे महागाईही वाढण्याची शक्यता आहे. त्यातच सौदी अरेबियाने जगाला आणखी एक टेन्शन दिले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळ्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता पाहता सौदी अरेबियाने आशियाई खरेदीदार देशांसाठी त्यांच्या प्रमुख कच्च्या तेलाची किंमत रेकॉर्ड प्रीमियमवर वाढवली आहे.

सरकारी मालकीची सौदी अरामको कंपनीने मे महिन्यातील विक्रीसाठी आपल्या अरब लाईट क्रूडची किंमत आशियाई रिफायनर्सकरिता प्रादेशिक मानकापेक्षा जास्त म्हणजेच प्रति बॅरल १९.५० डॉलर ठेवणार आहे असा ब्लूमबर्गने रिपोर्ट दिला आहे. या रिपोर्टमध्ये  एका किंमत सूचीचा संदर्भ देण्यात आला आहे. हा प्रीमियम विक्रमी उच्चांकावर असला तरी ब्लूमबर्गने सर्वेक्षण केलेल्या व्यापारी आणि रिफायनर्सनी अंदाज केलेल्या प्रति बॅरल ४० डॉलरच्या पातळीपेक्षा तो अजूनही कमी आहे.

सौदी अरेबियातून भारत किती करतो तेल आयात?

सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा फटका भारतासह इतर आशियाई देशांना बसणार आहे. भारत आपल्या गरजेच्या ८० टक्के तेल आयात करते. या पुरवठादार देशांच्या यादीत सौदी अरेबियाचे महत्त्वाचे स्थान आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये भारतात कच्चे तेल पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत सौदी अरेबिया दुसऱ्या नंबरवर आहे. ज्यांनी आपल्या शिपमेंटमध्ये उल्लेखनीय वाढ करत १.००९ मिलियन बॅरल प्रतिदिन केले आहे. सौदी अरेबियातून तेल आयात खासगी आणि सरकारी दोन्ही रिफायनरीत मोठ्या प्रमाणात झाले आहे. 

इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्णय 

दरम्यान, सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या दरात केलेली दरवाढ अशा वेळी आली आहे, जेव्हा इराणने होर्मुझची सामुद्रधुनी जवळजवळ बंद केल्यामुळे प्रादेशिक ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध सुरू केलेल्या युद्धामुळे पर्शियन आखातातून होणारा पुरवठा प्रभावीपणे थांबला आहे असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या जागतिक उलथापालथीमुळे तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. 

Web Title : सऊदी अरब द्वारा तेल की कीमतों में वृद्धि: क्या पेट्रोल की कीमतें बढ़ेंगी?

Web Summary : सऊदी अरब द्वारा एशियाई खरीदारों के लिए तेल की कीमतों में वृद्धि से चिंता बढ़ गई है। भारत सऊदी अरब से तेल आयात पर बहुत अधिक निर्भर है, क्षेत्रीय तनाव से बढ़ी कच्चे तेल की कीमतें पेट्रोल और डीजल की लागत को काफी प्रभावित कर सकती हैं।

Web Title : Saudi Arabia's Oil Price Hike: Will Petrol Prices Soar?

Web Summary : Saudi Arabia's oil price increase for Asian buyers raises concerns. With India heavily reliant on oil imports, especially from Saudi Arabia, rising crude prices, exacerbated by regional tensions, could significantly impact petrol and diesel costs.