शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 09:14 IST

Saudi Arab Prince America Visit: "ही केवळ भेट नव्हे तर क्राउन प्रिन्सचा सन्मानही होणार," असे ट्रम्प म्हणाले

Saudi Arab Prince America Visit: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची सध्या पाकिस्तानशी (Pakistan) उघडपणे जवळीक वाढताना दिसत आहेत. तशातच आता तब्बल ७ वर्षानंतर सौदी अरबचे क्राउन प्रिन्स (Crowned Prince) मोहम्मद बिन सलमान अमेरिका (Mohammed bin Salman Al Saud) दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे ट्रम्प प्रचंड आनंदी असल्याचे म्हटले जात आहे. ट्रम्प यांनी प्रिन्सच्या अमेरिका भेटीदरम्यान क्राउन प्रिन्सचे भव्य स्वागत करण्याची योजना आखली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सकाळी प्रिन्सचा स्वागत समारंभ आणि संध्याकाळी औपचारिक डिनर पार्टी होणार आहे. "आम्ही फक्त भेटणार नाही आहोत तर अमेरिका सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्सचा सन्मान करणार आहे," असे ट्रम्प यांनी फ्लोरिडा येथे सांगितले. ट्रम्प आणि क्राउन प्रिन्स मंगळवारी भेटतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प इतके आनंदी का?

ट्रम्प यांना सौदीशी सौहार्दाचे संबंध निर्माण करायचे आहेत. त्यासाठी त्यांनी खूप कामही केले आहे. त्यांना आशा आहे की सौदीदेखील इस्रायलशी राजकीय संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णय घेईल. ट्रम्प यांना आशा आहे की क्राउन प्रिन्स हे अब्राहम करारावर स्वाक्षरी करतील आणि तो करार पुढे सुरू ठेवण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जाईल. परंतु आतापर्यंत सौदीकडून याबाबत कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. "अब्राहम करार आमच्या वाटाघाटींचा भाग असेल आणि मला आशा आहे की सौदी अरेबिया लवकरच अब्राहम करारात सामील होईल," असे ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना आशा व्यक्त केली.

७ वर्षांपूर्वी झाला होता दौरा

तुर्कीमधील सौदी वाणिज्य दूतावासात बंडखोर पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येच्या काही महिन्यांपूर्वी, २०१८ मध्ये क्राउन प्रिन्स शेवटचे अमेरिका दौऱ्यावर आले होते. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या सीआयएच्या मूल्यांकनात असे म्हटले आहे की ही हत्या प्रिन्सच्या आदेशानुसार करण्यात आली होती. पण त्यांनी नेहमीच यातील सहभाग नाकारला होता. आगामी भेटीमुळे, अमेरिका-सौदी संबंधांमधील दुरावा कमी होण्याची चिन्हे आहेत. लष्करी बँडसह स्वागत समारंभ, ओव्हल ऑफिसमध्ये द्विपक्षीय बैठक आणि संध्याकाळी ब्लॅक-टाय डिनर असा क्राउन प्रिन्ससाठीचा थाटमाट असणार आहे.

व्हाईट हाऊसकडून 'मेसेज'

"राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अल सौद यांचे व्हाईट हाऊसमध्ये स्वागत करण्यास उत्सुक आहेत, जिथे दोन्ही नेते अधिकृत कामकाजाच्या बैठकीत सहभागी होतील. सध्या सुरू असलेल्या चर्चेवर आम्ही आताच भाष्य करणार नाही," असे व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सीएनएनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Saudi Prince's US Visit After 7 Years: Trump Elated; Here's Why

Web Summary : After 7 years, Saudi Crown Prince visits the US, delighting Trump. Trump hopes Saudi Arabia will establish ties with Israel and sign the Abraham Accords. The visit aims to improve US-Saudi relations after journalist Khashoggi's murder.
टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पUSअमेरिका